Kalaram temple
sakal
नाशिक: पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम संस्थानमधील विश्वस्तपदाच्या कालावधीबाबत पेच मिटण्याची चिन्हे नाहीत. सहधर्मदाय आयुक्त कार्यालयाने पारित केलेल्या निकालाच्या अनुषंगाने संस्थानच्या अध्यक्षांनी दोनदा विश्वस्त राहिलेल्या धनंजय पुजारी यांना त्यांच्याऐवजी दुसरे नाव सुचविण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे संस्थानच्या घटनेत विश्वस्तांची निवड व कालावधीबाबत कोणताही उल्लेख नसून या अन्याय्य आदेशाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे श्री. पुजारी यांनी म्हटले आहे.