Kalidas Kala Mandir : कालिदास कलामंदिर भाडेदर वाढीचा प्रस्ताव

Kalidas Kala Mandir
Kalidas Kala Mandiresakal

Kalidas Kala Mandir : शहराच्या नाट्य संस्कृतीचे व्यासपीठ ठरत असलेल्या कालिदास कलामंदिराच्या भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी घेऊन दरवाढ करण्याचे नियोजन आहे.

भाडे दरात वाढ केल्यास नाट्यप्रेमी अंगावर येतील, या भीतीने प्रशासनाने काही सेवांचे भाडे रद्द केल्याचे दर्शविले. परंतु, दुसरीकडे सत्राच्या दरात वाढ केल्याची बाब लपविली आहे. (Kalidas Kala Mandir rent rate hike proposal nashik news)

२०१७ मध्ये कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरणासाठी जवळपास साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात आले. लोकार्पण केल्यानंतर तत्काळ नवीन भाडेवाढ जाहीर करण्यात आली.

परंतु नाटकांना होणारी गर्दी लक्षात घेऊन नाट्यसंस्थांना भाडे दर परवडणारे नव्हते. त्यामुळे सुरवातीपासूनच दर कमी करण्याची मागणी होवू घातली. प्रशांत दामले, भारत जाधव यासारख्या नाट्यकलावंतांनी भाडे दरवाढीवर नाराजी व्यक्त केली.

कोरोनाकाळात नाटके बंद होती. कोविड परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर दर कमी करण्याच्या मागणीने जोर धरला. काही प्रमाणात भाडे दरात कपात करण्यात आली.

आता नाटकांचा जोर वाढत असल्याने तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी स्वउत्पन्नात वाढ करण्याचा भाग म्हणून छुपी भाडे दरवाढ करण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर केला जाणार आहे.

Kalidas Kala Mandir
NMC News: महापालिका लेखा परिक्षण विभागाचे खासगीकरण! द्विनोंद लेख्यांचे बाह्य संस्थेकडून लेखा परिक्षण

प्रशासनाची सारवासारव

घरपट्टी पावतीमध्ये विविध करांचा समावेश असतो. करवाढीला लोकप्रतिनिधींकडून कायम विरोध होत असल्याने प्रशासनाकडून उपकरांमध्ये वाढ केली जाते. त्याच धर्तीवर कालिदास कलामंदीरचे भाडे वाढ करताना करण्यात आले आहे.

तिन्ही सत्रात एक हजार रुपयांनी भाडे वाढविण्यात आले आहे. व्हीआयपी कक्षाचे पाचशे रुपये व स्पॉटलाईटचे शंभर रुपये हे अतिरिक्त शुल्क मोफत करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

परंतु अन्य सेवांचे शुल्क मुळ भाडे दरात समाविष्ट करण्यात आली असून, त्यामुळे दरवाढ झाल्याचे दिसतं असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. परंतु गरज नसताना अशा प्रकारचा प्रस्ताव आणलाच कसा असा प्रश्न येथे निर्माण होते.

असा आहे प्रस्ताव

- नाटकांचे सत्र तीन ऐवजी चार तासांचे.

- नाटकाच्या अर्धा तासांनी प्रतितास १ हजारांचा दंड.

- सुटीच्या दिवशी कार्यक्रमांना अडीच हजार रुपये अतिरिक्त.

- नाटकांच्या तालमीसाठी तीनशे ऐवजी पाचशे रुपये शुल्क.

- राजकीय मेळावे, लावणी, स्नेह संमेलनाला बंदी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kalidas Kala Mandir
NMC News: शहरातील फलकांवर इंग्रजीचाच बोलबाला; मराठी भाषा फलक नियम धाब्यावर! महापालिकेला कारवाईचा विसर

अशी असेल भाडे दरवाढ

- हौशी नाटक, रंगीत तालीम, बालनाट्यांसाठी प्रथम सत्रात साडेचार, दुसऱ्या सत्रात ६ हजार, तिसऱ्या सत्रात ७ हजार, तर चौथ्या सत्रात ९ हजार रुपये दर आकारण्याचा प्रस्ताव आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, जादूचे प्रयोग, व्याख्यान तसेच शास्रीय गायन, नृत्य, व्यावसायिक नाटकांचे ५०० रुपयांपर्यंत तिकीट दर असल्यास पहिल्या सत्रात साडेआठ हजार,

दुसरा सत्रात ११, तिसऱ्या सत्रात १३, तर चौथ्या सत्रात १५ हजार रुपये आकारले जाणार आहेत. ऑर्केस्ट्रा व अन्य कार्यक्रमांसाठी पहिल्या सत्रात १५, दुसऱ्या सत्रात २१ हजार, तिसऱ्या सत्रात २४, तर चौथ्या सत्रात २६ हजार रुपये दर आकारले जाणार आहेत.

शासकीय बैठकांसाठी पहिल्या सत्रात साडेचार हजार रुपये, दुसऱ्या सत्रात साडेपाच हजार, तिसऱ्या सत्रात ७ हजार व चौथ्या सत्रात ९ हजार रुपये, तर शासकीय नाटके, शास्त्रीय गायन, मराठी संगीतासाठी पहिल्या सत्रात ६ हजार १२५, दुसऱ्या सत्रात ८ हजार, तिसऱ्या सत्रात साडेनऊ हजार, तर चौथ्या सत्रात ११ हजार रुपये दर राहतील.

Kalidas Kala Mandir
Success Story : कठोर मेहनत,‌ जिद्दीतून विवाहितेची गरुड भरारी; ‘आशिया पॅसिफिक’साठी मंगला बागुल यांची निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com