कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
Published on: 
सेकंड मेन -- फोटो : B61052, B61064, B61063 -- सनई-चौघड्याचे स्वर अन्‌ कालिकादेवीचा जयघोष पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी; विधिवत घटस्थापना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : श्री संस्थान कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (ता. ११) पहाटे मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी विश्वस्तांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. मंगल सनई- चौघड्याचे मंजुळ स्वर, मंत्रोच्चार, देवीच्या जयघोषाने दुमदुमलेला मंदिर परिसर आणि भक्तांच्या मनातील श्रद्धाभाव यामुळे संपूर्ण वातावरण शक्तीच्या उपासनेत न्हाऊन निघाले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते श्री कालिकादेवीचा महाभिषेक, महापूजा आणि महाआरती झाली. या विधींमुळे नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर पडली. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनीही पहिल्या माळेला कालिकादेवीचे दर्शन घेतले. कालिका देवी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. देवीचे दर्शन सुलभतेने आणि सुरक्षितपणे घेता यावे, यासाठी मंदिर प्रशासनाकडून नियोजनबद्ध व्यवस्था केली होती. भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी तत्काळ दर्शनाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली. पहिल्याच दिवशी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. ---चौकट महिलांची भजनातून सेवा पहिल्या दिवशी विविध महिला भजनी मंडळांनी भक्तिगीतांचे सादरीकरण करून देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. भजनांच्या स्वरांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. देवीची स्तुती करणारी पदे, पारंपरिक भजने आणि सामूहिक नामस्मरणामुळे भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळाला. रात्री पाथर्डी येथील गोंधळी समाजाकडून कालिका देवी मंदिरात पारंपरिक जागर आणि गोंधळाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com