फोटो ओळी- 09641
कळवण ः कमको बँकेच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी बोलताना अध्यक्षा शलिनी महाजन. शेजारी सतीश कोठावदे, गजानन सोनजे, योगेश महाजन, संजय मालपुरे, नितीन वालखडे, भारती कोठावदे आदी.
कमको बँकेला दोन कोटींचा नफा
अध्यक्षा शलिनी महाजन यांची ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माहिती
कळवण, ता. २ ः कळवण मर्चंट्स बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश देणार असून, बँकेने दोन कोटी ५८ लाख ९१ हजार ६५४ रुपयांचा नफा झाल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा शलिनी महाजन यांनी दिली.
दि कळवण मर्चंट बँकेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २) वाणी मंगल कार्यालयात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. उपाध्यक्ष सतीश कोठावदे, जनसंपर्क संचालक प्रवीण संचेती, गजानन सोनजे, संजय मालपुरे, योगेश महाजन, नितीन वालखडे, डॉ. धर्मराज मुर्तडक, सुभाष शिरोडे, दीपक वेढणे, धनंजय अमृतकार, विनोद मालपुरे, लक्ष्मण खैरनार, रंगनाथ देवघरे, सागर शिरोरे, पोपट बहिरम, संचालिका भारती कोठावदे, तज्ज्ञ संचालक मयूर कोठावदे, अमोल ब्राह्मणकर,
प्रभाकर कोठावदे, राजन मालपुरे, भूषण कोतकर, कैलास जाधव, शाखाधिकारी प्रसन्न गायधनी, प्रवीण घुगे, प्रवीण खैरनार, महेंद्र भावसार आदी उपस्थित होते.
बँकेची सभासद संख्या ६८२४ असून भागभांडवल सहा कोटी ६१ हजार ४०० रुपये आहे. गंगाजळी व इतर निधी ६० कोटी ६० लाख ६९ हजार ९४७ रुपये तर ठेवी २४७ कोटी ४४ लाख १४ हजार २९० रुपये व गुंतवणूक १३० कोटी ९६ लाख ३५ हजार ५१९ आहे. सभासदांना १६१ कोटी ३१ लाख २५ हजार ८८ रुपयांचे कर्जवाटप झाले असून, बँकेला दोन कोटी ५८ लाख ९१ हजार ६५४ रुपयांचा झाला आहे. बँकेचे खेळते भागभांडवल ३२७ कोटी ६३ लाख २ हजार २०४ रुपये आहे.
उपाध्यक्ष कोठावदे यांनी बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून ग्राहकांशी आपुलकीचे नाते, पारदर्शक कारभार आणि सुरक्षित ठेवी हीच कमको बँकेच खरी ताकद आहेस असे सांगितले.
महाव्यवस्थापक कैलास जाधव यांनी अहवालवाचन केले. बँकेचे प्रगती अहवाल प्रवीण संचेती, नफा-तोटा वाचन नितीन वालखडे, तर लेखापरीक्षण अहवालवाचन संजय मालपुरे यांनी केले. सूत्रसंचालन गीता कायस्थ यांनी, तर आभार दीपक वेढणे यांनी मानले.