Latest Marathi News | पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबांचा 20 किलोमीटर पायी प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik latest Marathi News

पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबांचा 20 किलोमीटर पायी प्रवास

नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना शेंद्रीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) ते हरसूल असा वीस किलोमीटरचा प्रवास पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबा दहाड यांना करावा लागला. तेही आळूचे गाठोडे डोईवर घेऊन. घाटातील दाट जंगलातून पंच्याहत्तरी पार केलेले काळूबाबा काठीचा आधार घेत निघाले होते. (Latest Marathi News)

हेही वाचा: पोट कमी होत नाही? 'या' चार टिप्स ट्राय करा; आठ दिवसात दिसेल फरक

काळूबाबांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झालाय. उतरत्या वयात पत्नी, स्नुषा आणि नातवाला सांभाळण्याची वेळ बाबांवर आली आहे. शेती आहे पण ती करणार कोण? असा प्रश्न बाबांचा आहे. जंगलात फिरून त्यांनी आळू जमा केला. कापडी फडक्यात तो बांधला आणि बाबा निघाले थेट हरसूलच्या दिशेने. घरच्यांनी फडक्यात भाकरी बांधून दिली होती. पायी प्रवासात बाबांच्या पायात चप्पल नव्हती.

हेही वाचा: दहा हजारांत बेस्ट स्मार्टफोन; मिळतो 50MP कॅमेरा अन् 6000mAh बॅटरी

बाबा म्हणाले, की जंगलातून रानभाज्या,आळू जमा करून मी हरसूलमध्ये विकायला पायी जातो. पन्नास ते शंभर रुपये मिळतात. वाहनाने प्रवास केल्यास चाळीस रुपये भाडे लागते. म्हणून मी पायी प्रवास करतो. अडीच तास प्रवास केल्यावर हरसूलमध्ये पोचतो. भाजी विकल्यावर बाजार घेऊन परत पायी घराकडे निघतो.

Web Title: Kalu Baba From Shendripada Nashik Walk 20 Km Money

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikmoneyTribal Areas