मालेगाव शहर- ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ याच ध्येयाने दोन वर्षांपूर्वी बदलीने येऊन पालकांच्या सहकार्याने शाळा बदलली.नावीन्यपूर्ण उपक्रमांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवाडी निं (ता.मालेगाव) ही शाळा पंचक्रोशीत चर्चेत आली. .उपक्रमशील शिक्षक प्रकाश माळी यांच्या संकल्पनेतून ही धडपड यशस्वी होत आहे.सहकारी उपक्रमशील शिक्षिका विद्या कमुनकर यांच्या आनंददायी हसतखेळत शिक्षणाने पटसंख्येत वाढ झाली आहे..विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा समृद्धीकडे वाटचाल करून शंभर टक्के विद्यार्थी निपुण झाले.छोटीशी वाडी असतानाच गुणात्मक बदलांचा परिणाम स्वरूप आसपासच्या परिसरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने २८ पटावरून ४० पट गाठला आहे.शंभर टक्के उपस्थिती हीच खासियत असून मळ्यातील मुले असल्याने पालकांशी थेट संपर्क करून मार्गदर्शन पूरक ठरते..विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर मंथन परिक्षा,मॅथ बी,स्पेलिंग बी,बुद्धिबळ,हॅकथॉन अशा गुणवत्तापूर्ण उपक्रमांत सहभागी करण्यात येते.विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची माहिती व सराव करून घेतला जातो.विविध युट्युब व्हिडिओ निर्मिती,चॅनलद्वारे माहिती पाठवणे,पाढे सराव,स्पेअर लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहेत.पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा वाढदिवस सामाजिक दायित्व म्हणून घेण्यात येतो..शंभरावर झाडमाळरानावर दीड एकरात शाळा निसर्गरम्य केली आहे.नारळ,आंबा,चिकू, पेरूसह बदाम फळझाडांची लागवड करून पोषण आहारातील शेवगासह शंभरावर झाडे, रंगीबेरंगी फुलझाडांनी शाळा सुंदर व रमणीय वाटते. आकर्षक परसबागेला जिल्हा परिषदने प्रोत्साहनपर बक्षीस दिले आहे.शाळेला तारेच्या कुंपणाला पत्रा फिटिंग करून आकर्षक व वाचनीय बोलकी पेंटिंग असे आनंददायी वातावरण निर्माण करण्यात शिक्षक दांपत्य यशस्वी झाले आहे. .वृक्ष संवर्धनासाठी पालक व ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. झाडे जगविण्यासाठी श्री माळी यांचे उन्हाळ्यातील प्रयत्नांना शिक्षण प्रेमी युवकांची भक्कम साथ मिळते. शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव, प्रभारी गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, विस्तार अधिकारी नजीर पटेल, केंद्रप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू काळे, सरपंच सखुबाई पटांग्रे,उपसरपंच महेंद्र पाटील यांच्यासह आजी-माजी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, पालकांचे योगदान बदलत्या शाळेस प्रेरक आहे..नावीन्यपूर्ण उपक्रमलेकीचे झाड, स्पेलिंग बी,मॅथ बी, वार्षिक स्नेहसंमेलन, बचत बँक, गोष्टीचा शनिवार, कृतीयुक्त कविता सादरीकरण, परसबाग दहा महिने भाजीपाला, वाचाल तर वाचाल, पर्यावरणपूरक गणपती, शंभर टक्के उपस्थिती सन्मान, दहीहंडी उत्सव, तारखेनुसार पाढे, वृक्षारोपण वृक्षसंवर्धन.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.