कळवण- येथील प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप विषय शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी थेट प्रकल्पाधिकारी अकुनूरी नरेश यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.