Latest Marathi News | कळवणच्या लाचखोर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe Crime News

कळवणच्या लाचखोर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास अटक

नाशिक : रोजंदारीवर असलेल्या आश्रमशाळेच्या महिलेस सफाईकामगार एेवजी स्वयंपाकी पदाचा आदेश काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या सहायक प्रकल्प अधिकाऱ्यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाैचालयात पकडले. (Kalwan bribe taking assistant project officer arrested Nashik Crime Latest Marathi News)

प्रताप नागनाथराव वडजे(५४) असे संशयित लाचखाेर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याचे नाव आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण येथे सहायक प्रकल्पाधिकारी आहे. नाशिकच्या आदिवासी विकास विभागात आठवड्याभरात दुसरा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

गेल्या शुक्रवारीच आदिवासी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश बागूल हे 28 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले होते. या घटनेला चार दिवस होत नाही तोच पुन्हा याच खात्यातील कळवणच्या सहायक प्रकल्पाधिकाऱ्याला लाच घेतांना साेमवारी (दि.29) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे.

हेही वाचा: अभिनेत्रीची आत्महत्या; कृपया रडू नका सुसाईड नोटमध्ये आईबाबांना केली विनंती

विशेष म्हणजे या आधिकाऱ्याने शौचालयात लाच स्विकारल्याने ताे चर्चेचा विषय ठरला आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे संबंधित विभागाने रोजंदारीवरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असतील, असे आदेश काढले होते. ते कामाठी किवा स्वयंपाकी असे नव्याने आदेश बदलून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात दहा हजार रुपये लाचेची मागणी केली हाेती.

त्यानंतर तक्रार प्राप्त हाेताच, लाच लुतपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक वैशाली पाटील यांच्या पथकाने सदरची कारवाई केली रात्री उशिरापर्यंत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

हेही वाचा: स्वर्गाहून सुंदर आहेत कंचनजंगामधील ही ठिकाणे

Web Title: Kalwan Bribe Taking Assistant Project Officer Arrested Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..