कळवण- येथील बसस्थानकासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पाच बस उपलब्ध झाल्या. येत्या काही दिवसांत आणखी दहा नवीन बस दाखल होणार आहे. आज रविवारी (ता. ३०) कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बसचे लोकार्पण करण्यात आले.