कळवणच्या वनपरीक्षेत्र विभागात श्रमदान आणि लोकसहभागातून आदर्श, परीक्षेत्रातील 24 गावात 54 वनराई बंधारे पूर्ण

कळवणच्या वनपरीक्षेत्र विभागात श्रमदान आणि लोकसहभागातून आदर्श, परीक्षेत्रातील 24 गावात 54  वनराई बंधारे पूर्ण
Published on: 
पान एक मेन ---------------- 09865 चिंचपाडा : वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांच्या मदतीने पूर्ण करण्यात आलेला बंधारा. कळवण तालुक्यात लोकसहभागातून ५४ वनराई बंधारे लोकसहभागातून जलसंधारणाचा आदर्श; दुष्काळावर मात करण्यासाठी मोहीम सकाळ वृत्तसेवा कळवण, ता. ६ : चालू वर्षी दुष्काळाच्या ''ट्रिगर-१'' मध्ये समावेश झालेल्या कळवण तालुक्यात वनविभागाने लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आमदार नितीन पवार यांनी घेतलेल्या दुष्काळ नियोजन आढावा बैठकीतील आवाहनाला प्रतिसाद देत, वनविभागाने कळवण वनपरिक्षेत्रांतर्गत तब्बल २४ गावांमध्ये श्रमदान व लोकसहभागातून ५४ ''वनराई बंधारे'' यशस्वीरीत्या पूर्ण केले. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने शासनाने कळवण तालुक्याचा ''ट्रिगर-१'' मध्ये समावेश केला आहे. आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांनी तालुकास्तरीय दुष्काळ नियोजन आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत प्रशासनाने केवळ कागदोपत्री काम न करता प्रत्यक्ष जमिनीवर जलसंधारणाची कामे करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. प्रत्येक नाला व ओढा अडवून पाणी जमिनीत जिरवण्यासाठी वनराई बंधारे हा कमी खर्चिक व प्रभावी उपाय असल्याचे सांगत त्यांनी लोकसहभाग व श्रमदानातून हे बंधारे उभारण्याचे आवाहन केले होते. आमदार पवार यांच्या या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देत कळवण वनपरिक्षेत्राने जलसंधारणाची प्रभावी चळवळ उभारली. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक आणि २४ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून ५४ वनराई बंधारे पूर्णत्वास नेले. हे वनराई बंधारे तयार झाल्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे लाखो लिटर पाणी प्रभावीपणे अडवले जाणार आहे. यामुळे वनक्षेत्रातील ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल, उन्हाळ्यात वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होईल आणि परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या विहिरी व कूपनलिकेच्या पाणीपातळीत मोठी वाढ होईल. ----- नियोजनबद्ध आराखडा कळवण परिक्षेत्रांतर्गत या मोहिमेचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले होते. वनरक्षकांनी प्रत्येक गावात प्रत्यक्ष जाऊन नाल्यांची पाहणी केली आणि बंधाऱ्यासाठी योग्य जागा निश्चित केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून हे बंधारे उभे राहिले. या लोकचळवळीत शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्तपणे हातभार लावला. गावनिहाय बंधारे दहयाणे, ओतूर (२) , भूसणी-मार्कडपिंप्री (५), जामलेवणी (२), बालापूर (२), वाडी खुर्द (१), मुळाणे-वणी (५), दरेभणगी (४), हुंड्यामोख (१), नाकोडा (५), मळगाव बुद्रुक (२), मळगाव खुर्द (१), चिंचपाडा (२), अंबुर्डी खुर्द (२), दत्तनगर (१), मोहमुख (१), कुंडाणे (१), देवळीवणी (१), जामशेत (१), चिंचोरे (३), साकोरे (३), आठबे (२), नांदुरी (५), सप्तशृंगी गड (२), आमदार नितीन पवार यांच्या आवाहनानुसार शासनाच्या निधीची वाट न पाहता श्रमदान व लोकसहभागातून २४ गावांत ५४ वनराई बंधारे बांधण्याचे काम यशस्वी झाले आहे. यापुढेही परिक्षेत्रातील प्रत्येक नाल्यावर वनराई बंधारा बांधण्याचे आमचे नियोजन आहे. दीपाली गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.