धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33507
धुळे : मनपास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्या कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेच्या दोन्ही संघांसमवेत के. यू. नाबरिया. शेजारी छाया नाईक, वंदना खैरनार, अरुणा सोनवणे, आदी.
--
व्हॉलीबॉलच्या मैदानावर कमलाबाई शाळेचा डंका
--
मनपास्तरीय स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या विजेतेपदावर मोहोर
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : शालेय व्हॉलीबॉलच्या मैदानावर कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेच्या मुलींनी दमदार खेळाची छाप उमटवत दुहेरी विजेतेपदावर नाव कोरले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरूड मैदानावर मनपास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली. यामध्ये १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले.
-
स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटांतील सामने रंगले. कमलाबाई शाळेच्या खेळाडूंनी सांघिक समन्वय, चपळता, जिद्द आणि शिस्तीच्या बळावर वर्चस्व सिद्ध केले. चौदा वर्षांखालील संघाच्या विजयी भरारीत कर्णधार चैताली फुलदेवरे हिच्यासह एमन शेख, हेतल सोनवणे, भाग्यश्री धुर्वे, यताश्री चौधरी, आरोही रामराजे, सेजल खैरनार, आनंदी चव्हाण, मंजिरी कदम, गौरी कासार, लावण्या अहिरे आणि सिद्धी हटकर यांनी योगदान दिले. तसेच १७ वर्षांखालील गटात कीर्ती पाटील, राजेश्वरी जगताप, दिव्या सरोदे, क्षितिजा लाडे, जयश्री धुर्वे, प्रिया जोशी, पूर्वा मराठे, दृष्टी कंड्रे, तनुश्री मराठे, कल्याणी चौधरी, विधी जाधव आणि हर्षदा सोनवणे यांनी चमकदार खेळ करत विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष के. यू. नाबरिया, सचिव शिल्पा म्हस्कर, मुख्याध्यापिका छाया नाईक, उपमुख्याध्यापिका वंदना खैरनार, पर्यवेक्षिका अरुणा सोनवणे, अरुंधती ब्रह्मे आणि मनीषा पवार यांनी खेळाडूंचे कौतुक केले. क्रीडाशिक्षिका मनीषा पवार, सुनंदा मोरे आणि महेंद्र गावडे यांचे मार्गदर्शन झाले.