कामटवाड्यातील खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

कामटवाड्यातील खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप
Published on: 
कामटवाड्यातील खूनप्रकरणी जन्मठेप जिल्हा न्यायालयाने लाखाचा दंडही ठोठावला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : कामठवाडे रस्त्यावर जुन्या वादातून तरुणावर फरशीने वार करून खून केल्याप्रकरणी संशयिताला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ५ हजार रुपयांचा दंड आणि मृत तरुणाच्या आई-वडिलांना एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. आनंद देवराम आंबेकर (२९, रा. शिवपुरी चौक, पंडितनगर, सिडको) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. कामठवाडे रस्त्यावरील मरिमाता मंदिरासमोर ५ फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी साडेपाच- सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. संशयित आनंद आंबेकर याने आनंदा वसंत इंगळे (वय ३०) याला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यावर फरशीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. वसंत सखाराम इंगळे (रा. कामठवाडे) यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंमलदार रवी शिरोळे यांनी केला. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयात झाली. परिस्थितिजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला ५ हजारांचा दंड आणि मृत तरुणाच्या आई-वडिलांना एका महिन्याच्या आत १ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती भानुप्रिया पेटकर व आर. पी. गावित यांनी युक्तिवाद केला. कोर्ट अंमलदार रंजना गायकवाड, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, अंमलदार रामनाथ आजगे यांनी पैरवी अधिकारी म्हणून पाठपुरावा केला. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.