
नाशिक : अनेक संकटांशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथांची समाजात नेहमीच चर्चा होते. त्यातून शेतकऱ्यांना सहानुभूती मिळते. मात्र, शेतकऱ्यांचं एकूणच जगणं बाह्य जगाला कळत नाही. शेतकऱ्यांच्या जगण्यातील हा अंत:कलह जगाला कळला, तरच हा जगाचा पोशिंदा चार दिवस सुखाचे पाहू शकेल.
अन्यथा शेतकरी आत्महत्यांचे पीक यापुढेही येतच राहील. किंबहुना त्याचे हंगामच्या हंगाम समाजाला पचवावे लागतील. ही वस्तुस्थिती मांडण्याचा लक्षनिय प्रयत्न ‘चांदणी’ या नाटकातून प्रेक्षकांनी अनुभवला. (Kamgar Kalyan Natya Spardha Chandni play that sheds light on lives of farmers nashik news)
येथे सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्यमहोत्सवात शुक्रवारी (ता. ३०) नेहरुनगर कामगार कल्याण केंद्रातर्फे ‘चांदणी’ हे नाटक सादर झाले. रोहित पगारे लिखीत अन् दिग्दर्शीत या नाटकाने प्रेक्षकांना एका संवेदनशील विषयावर विचार करण्यास भाग पाडले.
ओम देशमुख यांचे ध्वनी संयोजन, रवी रहाणे यांची प्रकाशयोजना यासारख्या तांत्रिक बाबींसाठीही संपूर्ण टीमने जीव ओतल्याचे केवळ जाणवलेच नाही, तर वेळोवेळी प्रेक्षकांचा प्रतिसाद अन् वाहवा देखील मिळवत होते. सारेकाही यथायोग्य नेपथ्य भूषण गायकवाड यांनी केले. माणिक कानडे यांची रंगभूषा आणि मिलिंद साळवे यांची वेशभूषाही उत्तम होती.
विशेष म्हणजे या सर्वांच्या जोडीला दिलीप काळे, भरत कुलकर्णी, अनुजा देवरे यांचा अभिनय उल्लेखनीय होता. यासह संदीप खरात, संदीप बच्छाव, अभिमान खैरनार या कलावंतांनी भूमिका साकारल्या.
नाशिककर नाट्य रसिकांच्या अपेक्षेप्रमाणे हे नाटक खऱ्या अर्थाने स्पर्धेतील सादरीकरण ठरले. उत्कृष्ट सादरीकरण झालेला ‘चांदणी’ हा नाट्यप्रयोग संस्थेला स्पर्धेत टिकवून ठेवेल यात शंका नाही.
आज सुटी
दरम्यान, महोत्सवाच्या नियोजित वेळापत्रकानुसार शनिवारी (ता. ३१) एकही नाटक सादर होणार नाही. रविवारी (ता. १) सिडकोतील ल. क. भवन वसाहततर्फे ‘अखेर चासवाल’ हे नाटक सादर होणार आहे. वसंत कानेटकर लिखीत या नाटकाच्या दिग्दर्शक संगिता फुके आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.