श्री.कन्हय्यालाल महाराजांचा शनिवार पासून यात्रोत्सव श्रीक्षेत्र आमळी : व्यापारी, व्यावसायिक दाखल

श्री.कन्हय्यालाल महाराजांचा  शनिवार पासून यात्रोत्सव   श्रीक्षेत्र आमळी :  व्यापारी, व्यावसायिक दाखल
Published on: 
पान-४ मेन फोटो- 00308, 00309 आमळी (ता. साक्री) : श्री कन्हय्यालाल महाराजांची मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात श्री कन्हय्यालाल महाराजांचे मंदिर. कन्हय्यालाल महाराजांच्या यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात श्रीक्षेत्र आमळी; व्यापारी, व्यावसायिकांची लगबग; बहुतांश दुकाने थाटली सकाळ वृत्तसेवा आमळी, ता. १९ : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व दीपोत्सवानंतर कार्तिकी एकादशीला होणाऱ्या धुळे जिल्ह्यातील पहिल्या श्री कन्हय्यालाल महाराजांच्या (विष्णू भगवान) प्रसिद्ध यात्रोत्सवास शनिवार (ता. २१) पासून उत्साहात प्रारंभ होत आहे. त्यामुळे लवकरच लाखो भाविकांचे आमळीत आगमन होणार आहे. वार्षिक यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांची लगबग दिवाळीनंतरच मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून, बहुतांश व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. ................. मंदिर परिसरात सायंकाळी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघालेला परिसर व रस्ते अशी सध्याची स्थिती आहे. तर दिवाळीपासूनच कुटुंबीयांसह देवदर्शन, मित्रपरिवाराच्या भेटीगाठी यामुळे परिसरातील गावांमधेही भाविकांची वर्दळ वाढली असून, घराघरांसमोरील आकर्षक रांगोळ्यांमुळे उत्सवी वातावरणात अधिकच भर पडली आहे. पहाटेपासून प्रसन्न झालेला उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम असतो. तर व्यावसायिक मात्र दिवस-रात्र दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये सजावटीची कामे सुरू करण्यात व्यस्त आहेत. सध्या उंच पाळणे, मौत का कुवा, हॉटेल, पूजेचे साहित्य व मनोरंजनाचे साहित्यही सज्ज झाली आहेत. जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी जादा बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. दरम्यान, दीपोत्सवानंतर सर्वांना वेध लागतात ते येथील प्रसिद्ध कन्हय्यालाल महाराजांच्या कार्तिकी यात्रोत्सवाचे... यात्रास्थळी उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राज्यासह गुजरात व मध्य प्रदेश असे तीन राज्यांतील भाविक दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी येत असतात. नवसाला पावणारे देव म्हणून कन्हय्यालाल महाराजांची सर्वत्र ख्याती आहे. त्यामुळे श्रद्धा असणारे लाखो भाविक आमळीत येतात. काही भाविक पायी वारीने येतात. सध्या राज्यासह परराज्यातील विविध व्यावसायिक व्यापारी आठवडाभरापासून आमळीत दाखल होत असून, आपापल्या जागेवर दुकाने थाटण्याची कामे दिवस-रात्र सुरू आहेत. मात्र यंदा वाढती महागाई व राज्यावर असलेले दुष्काळाचे सावट यात्रोत्सवावर आहे. तर दिवाळीच्या सुटीनिमित्त राज्यभरातून भाविक दर्शनासाठी कुटुंबीयांसह दाखल होत आहेत. परिणामी आत्तापासूनच कोंडाईबारी-आमळी मार्गावरील खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. यात्रोत्सवापूर्वीच भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. यात्रोत्सवादरम्यान लाखो भाविक दर्शन व नवसपूर्तीसाठी येत असल्याने यात्रास्थळी मोठ्या प्रमाणावर खरेदीही करतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची मोठी उलाढाल होते. यात्रेत मनोरंजनपर साधने, संसारोपयोगी साहित्य, शेती अवजारे, तमाशा, कपडे, मसाले, किराणा, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ, फळे, धार्मिक साहित्य, देव-देवतांचे फोटो, पूजेचे साहित्य, पेढे, नारळ, खजूर, अननस आदी दुकानांची रेलचेल असते. यात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने दर्शन व नवसपूर्तीसाठी भाविकांसह व्यावसायिकांची गर्दी होत आहे. वर्षभरापासून मुख्य मंदिराचे कळसापासून तर बाहेरील व आतील तसेच गाभाऱ्यासह आतील व बाहेरील नवीन बांधकाम व सजावटीची कामे सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली असून, बहुतांश कामे सुरू आहेत. तर उर्वरित कामे यात्रोत्सवानंतर पूर्ण केले जातील, असे मंदिर ट्रस्टचे किरण दहिते यांनी ‘सकाळ’ला सांगितले. मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. यात्रोत्सवात २४ तास मंदिर खुले राहणार आहे. मंदिर समितीकडून परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच मंदिर, आमळीत व यात्रोत्सव परिसरात चोवीस तास दिवस-रात्र जादा पोलिस बंदोबस्त शुक्रवारपासून राहणार असल्याचे पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव सहारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.