फोटो क्रमांक : 33244
दोंडाईचा : कांतिलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात हस्ती बँकेच्या क्यूआर कोड व साउंड बॉक्स सुविधेच्या प्रारंभावेळी उद्योगपती अशोक जैन. शेजारी किशोर जैन, पहलाज माखीजा, वासुदेव पाटील, पांडुरंग कांगणे आदी.
---
हस्ती बँकेच्या डिजिटल सेवांना नवी गती
--
कांतिलाल जैन जयंतीनिमित्त साउंड बॉक्स सेवेचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : खानदेशरत्न तथा हस्ती बँकेचे आधारस्तंभ कांतिलाल जैन यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त हस्ती बँकेतर्फे क्यूआर साउंड बॉक्स सेवेचा प्रारंभ झाला. जैन यांच्या स्मृतींना अभिवादन करून सुरू केलेल्या या सुविधेमुळे व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांच्या डिजिटल व्यवहारांना अधिक पारदर्शकता व गती मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत उपस्थित व्यापाऱ्यांना क्यूआर कोड आणि साउंड बॉक्सचे वाटप करण्यात आले. ग्राहकाने क्यूआर कोडद्वारे पेमेंट करताच साउंड बॉक्समधून रक्कम प्राप्त झाल्याची ध्वनिसूचना त्वरित मिळते. त्यामुळे दुकानात गर्दीवेळी व्यापाऱ्यांना वारंवार मोबाईल तपासण्याची गरज उरणार नाही. लहान दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी ही सोयीस्कर सुविधा ठरणार आहे. सहकाराला दूरदृष्टी, शिक्षणाला दिशा आणि समाजसेवेला माणुसकीची जोड देणाऱ्या कांतिलाल जैन यांच्या सेवाभावी विचारांचा वारसा पुढे नेणारा हा उपक्रम ठरला आहे.
उद्योगपती अशोक जैन, दोंडाईचा शाखा समितीचे अध्यक्ष किशोर जैन, संचालक पहलाज माखीजा, वासुदेव पाटील, पांडुरंग कांगणे, संचालिका मधुबाला जैन, मंजूषा पाटील, बँकिंग तज्ज्ञ प्रकाश कुचेरिया, शाखा समिती सदस्य प्रदीप जैन, बँकेचे ग्राहक व सभासद धरमचंद बोथरा, बी. बी. पाटील, चोईथ कुकरेजा, सुभाष जैन, किशोर कासार, पंकज चोळके, डॉ. बी. एम. जैन, दीपक बोदवाणी, अजय पाटील, सुनील चौधरी, महिंद्र चौधरी, डॉ. महिंद्र जैन, अभय पवार, योगेश पाटील, गौतम माखिजा, राजेंद्र गेलडा, जगदीश चौधरी, योगेश भावसार, पी. जी. पाटील, पंडित पाटील आदी उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश जैन, आयटी हेड सुनील गर्गे, वरिष्ठ व्यवस्थापक अमर छाबडिया, मुख्य शाखा व्यवस्थापक मनोज सोनवणे आदींनी संयोजन केले.