धुळे : टुडे पान ४ साठी..
--
हस्ती स्कूल्समध्ये कांतीलाल
जैन यांची जयंती उत्साहात
--
गुणवत्तेसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी कटिबद्धतेची प्रतिज्ञा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : दोंडाईचास्थित हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, हस्ती वर्ल्ड स्कूल व हस्ती गुरुकुल दाऊळ शिवार येथे सहकार महर्षी दिवंगत कांतीलाल जैन यांची ८० वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष कांतीलालजी जैन यांच्या प्रतिमेचे पूजन हेड बॉय, हेड गर्ल, वाढदिवस असलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. हस्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रझिया दाऊदी, हस्ती वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य जिवन सपकाळे, हस्ती गुरुकुलचे मुख्याध्यापक सदाशिव महाजन आणि सर्व समन्वयक उपस्थित होते.
-
धनंजय भदाणे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक मनोज ठाकूर यांनी जैन यांचे जीवनचरित्र कथन करताना स्वयंशिस्त, कर्तव्यनिष्ठा व पारदर्शक व्यवहाराचे तत्व विशद केले. समन्वयिका समिना बोहरी, ज्येष्ठ शिक्षक सुरेंद्र खंडारे आणि पंकज जाधव यांनी जैन यांनी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून समाजऋण फेडल्याचे तसेच हस्ती बँकेच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगारनिर्मिती करून दिल्याचे सांगितले. मुख्याध्यापक सदाशिव महाजन यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला. या प्रसंगी उपस्थित प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेतली.