धुळे : टुडे पान ४ साठी..
--
फोटो क्रमांक : 33580
दोंडाईचा : हस्ती क्रीडा संकुल येथे झालेल्या १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या क्रिकेट स्पर्धेच्या प्रारंभी कांतीलाल जैन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्या रझिया दाऊदी. शेजारी सदाशिव महाजन, महेश डिगराळे, समिना बोहरी, क्रीडा शिक्षक आदी.
--
जैन यांच्या जयंतीनिमित्त दोंडाईचात क्रिकेट स्पर्धा
--
नवोदित खेळाडूंनी दाखवला खेळ; १८० खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : दोंडाईचास्थित हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती ग्रुप ऑफ स्कूल दाऊळ शिवार आणि धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कांतीलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त १७ वर्षांखालील मुले व मुली यांच्याकरीता क्रिकेट स्पर्धा झाल्या. हस्ती क्रीडा संकुल दाऊळ शिवार मैदानावर ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
-
कांतीलाल जैन प्रतिमेचे स्पर्धेच्या प्रारंभी पूजन करण्यात आले. नंतर हस्ती स्कूलच्या प्राचार्या रझिया दाऊदी यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. हस्ती गुरुकुलचे मुख्याध्यापक सदाशिव महाजन, समन्वयक महेश डिगराळे, समन्वयिका समिना बोहरी तसेच क्रीडा शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक महाजन यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडूंनी जिद्दीने व कौशल्याने खेळ खेळावा, असे आवाहन केले.
स्पर्धेत एकूण १२ मुलांचे संघ व ७ मुलींचे संघ मिळून १८० खेळाडू सहभागी झाले होते. यात मुलींच्या १७ वर्षांखालील संघात प्रथम क्रमांकाने अहिंसा पब्लिक स्कूल व द्वितीय क्रमांकाने जिजामाता हायस्कूल धुळे विजयी झाला. तर मुलांमध्ये प्रथम क्रमांकाने साक्री येथील न्यु इंग्लिश स्कूल, द्वितीय क्रमांक धुळे येथील एस. एस. वि. पी. एस. स्कूल तसेच रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. हे विजयी संघ धाराशिव येथे राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यात सहभागी होणार आहेत. क्रीडा शिक्षक विशाल पवार, दुर्गेश पवार, मेघराज बैसाने, चेतन नायक, क्रीडा शिक्षिका पुष्पा साळवे, अश्विनी गिरासे यांनी संयोजन केले.