कापडणे स्वखर्चाने क्रीडासंकुल

कापडणे स्वखर्चाने क्रीडासंकुल
Published on: 
KPD26B13549 कापडणे : छत्रपती संभाजी महाराज क्रीडासंकुलाच्या कामाचे भूमिपूजन करताना रामदास वाघ, नवल पाटील, भटू पाटील आदी. ------- युवा उद्योजक स्वखर्चाने साकारतोय क्रीडा संकुल कापडणेत योगेश पाटील यांचा संकल्प; साहित्यिक रामदास वाघ यांच्या हस्ते कामास प्रारंभ सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. २५ : कापडणे व धनूर येथील पोलिस, सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची धडपड पाहून कापडणेचे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील यांनी मोठे शिवधनुष्य उचलले आहे. धनूर रस्त्यालगत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाचा संपूर्ण कायापालट करून त्याठिकाणी सुसज्ज क्रीडा संकुल स्वखर्चातून उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या कामाचा प्रारंभ ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या हस्ते झाला. या वेळी योगेश पाटील, धनूरचे माजी सरपंच चेतन शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य नवल पाटील, माजी सदस्य भटू पाटील, निवृत्त प्राचार्य विश्वासराव देसले, उद्योजक अरुण पाटील, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, माजी सरपंच हरीश पाटील, दादू गुरव, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. साहित्यिक वाघ म्हणाले, गावच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांनी समर्पणाची वृत्ती जोपासली पाहिजे. पाटील यांचे हे कार्य त्याच समर्पणाचे जिवंत उदाहरण असून, समर्पण हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. निवृत्त प्राचार्य देसले म्हणाले, भरतीसाठी धावणाऱ्या मुलांना हक्काची जागा नसल्याने त्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी योगेश पाटील यांनी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. केवळ बोलण्यापेक्षा कृतीतून गावसेवा कशी करावी याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. या संकुलासाठी येणारा संपूर्ण खर्च ते स्वतः उचलणार आहेत. भटू पाटील यांनीही मार्गदर्शन केले. विशाल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भरत पाटील यांनी आभार मानलेत. ------- क्रीडांसकुलातील सुविधा - अतिक्रमण रोखण्यासाठी तारेचे संरक्षक कुंपण - भरतीपूर्व युवकांसाठी ४०० मीटरचा मातीचा रनिंग ट्रॅक - कबड्डी, खो- खो, क्रिकेटसाठी प्रशस्त मैदान - तरुणांच्या फिटनेससाठी अत्याधुनिक ओपन जीम - विद्युत रोषणाई, वृक्षारोपण, बसण्यासाठी बाक - सीसीटीव्ही व सोलर लॅम्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com