NSK26H34414
जळगाव : शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेला सार्थक साळुखे व कांस्यपदक विजेता यज्ञेश चौरे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करताना प्राध्यापक व क्रीडा मार्गदर्शक.
कराटे स्पर्धेत सार्थक साळुखेला सुवर्णपदक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
यज्ञेश चौरे याला कांस्यपदक; स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव,ता.३ : शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी सार्थक साळुखे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले. या यशाच्या जोरावर त्याची शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच यज्ञेश चौरे याने कांस्यपदक मिळवून महाविद्यालयाच्या यशात भर घातली.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. एम. जे. स्वायत्त महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. केतन नारखेडे, के.सी.ई. सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. आर. बी. ठाकरे, प्रा. स्वाती बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी आणि जिमखाना समितीच्या अध्यक्षा प्रा. वर्षा पाटील यांनी खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय स्पर्धेतही सार्थकने अशीच चमकदार कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.