Bharat Jodo Yatra : भारत जोडोत कृत्रिम पायावर दीपचंद चालले 100 मीटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik's Kargil warrior Deepchand walks on artificial legs while interacting with Rahul Gandhi.

Bharat Jodo Yatra : भारत जोडोत कृत्रिम पायावर दीपचंद चालले 100 मीटर

नाशिक रोड : नाशिक येथील लॅम रोडला राहणारे कारगिल योद्धे दीपचंद यांनी भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग नोंदवला. खामगाव ते बाळापूर दरम्यान ते राहुल गांधी यांच्याबरोबर शंभर मीटर अंतर चालले. नाशिकपासून निघालेल्या दीपचंद यांनी अखेर राहुल गांधींना भेटण्याची इच्छा पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. (kargil war hero Deepchand walked 100 meters on artificial leg in Bharati Jodo Nashik News)

हेही वाचा: Nashik : पक्ष्यांच्या किलबिलाटाने बागलाणचा परिसर बहरला; पर्यटकांना पडतेय भुरळ

श्री. दीपचंद कारगिल योद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांचा एक हात आणि दोन पाय देशसेवा करताना निकामी झालेले आहेत. ते कृत्रिम पायांवर चालतात. एका हाताने सर्व कामे करतात. राहुल गांधींना भेटण्यासाठी दीपचंद यांनी आदल्या दिवशी खामगाव येथे मुक्काम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सकाळी शेगावच्या दिशेने निघाले. पदाधिकाऱ्यांनी त्यांना राहुल गांधींची भेट घालून दिली, तेव्हा राहुल गांधींनी त्यांना मिठी मारत ‘मी तुमच्यासाठी काय करू सांगा? असे सांगितले. या भेटीने भारावलेल्या दीपचंद यांनी मी तुमच्या सामाजिक लढ्यासाठी काय योगदान देऊ शकतो सांगा असे म्हटले.

त्यांनी राहुल गांधींना एक टोपी सप्रेम भेट दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या कृत्रिम पायांनी शंभर मीटर अंतर राहुल गांधीं बरोबर चालण्याची इच्छा व्यक्त केली. राहुल गांधींनी त्यांच्याबरोबर बरेच अंतर चालले. यादरम्यान त्यांच्यात विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे दीपचंद यांनी सांगितले. दरम्यान नायक दीपचंद हे ऑपरेशन विजयमध्ये टोलोलिंगवर पहिला गोळीबार करणारे सैनिक आहेत. ऑपरेशन पराक्रमादरम्यान, स्टोअर्स अनलोड करत असताना झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांना हात गमवावा लागला. तोफ डागताना दोन्ही पाय निकामी झाले, पर्यायाने दोन्ही पायही काढावे लागले. देशसेवा करताना आलेल्या या आघातानंतरही ते सावरले अन अजूनही सक्रिय असून शहिदांच्या कुटुंबासाठी अजूनही सक्रिय आहेत.

हेही वाचा: Nashik Winter : द्राक्षपंढरीला भरली हुडहुडी!; हंगामातील नीचांकी 8.5 अंशांवर तापमान

टॅग्स :Rahul GandhiNashikkargil