कर्जतमधील जंगलतोडीविरोधात ॲड. सुरेश आव्हाड यांची युनेस्कोसह केंद्र व राज्य सरकारकडे धाव

कर्जतमधील जंगलतोडीविरोधात ॲड. सुरेश आव्हाड यांची युनेस्कोसह केंद्र व राज्य सरकारकडे धाव
Published on: 
कर्जत वृक्षतोडीला स्थगिती देऊन प्रकल्प स्थलांतरित करा ॲड. सुरेश आव्हाड यांची मागणी; युनेस्कोसह केंद्र व राज्य सरकारकडे तक्रार सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १४ : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात प्रस्तावित तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या उपसा जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल ३२ हजार ४९० झाडे तोडण्याचा प्रस्ताव असल्याने पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वृक्षतोडीला विरोध करीत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी युनेस्कोसह केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडे तक्रार दाखल केली. प्रस्तावित वृक्षतोड थांबवून प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता, वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास आणि शेकरू या राज्य प्राण्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. तसेच, स्थानिक आदिवासी बांधवांच्या पारंपरिक उपजीविकेवरही या प्रकल्पाचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी तक्रारीत नमूद केली. प्रकल्पाची स्वतंत्र पर्यावरणीय पुनर्तपासणी करावी, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीची चौकशी करावी आणि स्थानिक नागरिकांसह ग्रामसभांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती देऊन कमी पर्यावरणीय हानी होणाऱ्या पर्यायी जागेचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. विकासाच्या नावाखाली जंगलसंपत्तीचे अपरिवर्तनीय नुकसान होऊ नये, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. या प्रकरणाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणार असून, गरज पडल्यास पर्यावरण संरक्षणासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.