लासलगाव- कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (रानवड) येत्या गाळप हंगामापासून सुरू होणार आहे. कित्येक दिवासंपासून बंद पडलेले बॉयलर पुन्हा पेटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कारखान्याचा गाळप हंगाम भाडेपट्ट्याने सुरू ठेवण्यासाठी नवीन फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.