मालेगावात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

मालेगावात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
Published on: 
पान तीन ॲंकर ------------- 12219 मालेगाव शहर: येथील भारत विद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना शिक्षक. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना अभिवादन शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदानला उजाळा सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता.६: महाराष्ट्रातील कुळकायद्याचे जनक शिक्षण व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथीनिमित्त शहर व परिसरातील शाळा महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्राचार्य डॉ. मृणाल भारद्वाज यांच्या हस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ.भारद्वाज यांनी मनोगत व्यक्त करताना, कर्मवीर हिरे यांचे शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदान विशद केले. उपप्राचार्य डॉ. दीपांजली बोरसे, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ.वैजयंती रामावत, कार्यालयीन अधिक्षक गोविंद मगरे, प्राध्यापक ,कार्यालयीन प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मराठी अध्यापक विद्यालय मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळेतर्फे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीस्थळावर व पूर्णाकृती पुतळ्यास प्राचार्य व्ही. डी. सोनवणे हार अर्पण करून अभिवादन केले. डी.एम. चौधरी यांनी शिक्षणमहर्षी ,कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य व राजकीय कार्यविषयी माहिती दिली. प्रा.प्रदीप पाटील यांनी सूत्रसंचालन तर प्रा.एम. बी. खैरनार यांनी आभार मानले. यावेळी सर्व प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. म.स.गा महाविद्यालय मसगा स्वायत्त महाविद्यालयातर्फे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. प्रा.राहुल देसले यांनी कर्मवीरांच्या कार्याचा गौरव केला. प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी नोडल ऑफिसर डॉ. कल्याण कोकणे, पर्यवेक्षक प्रा. पी.ए.अहिरे, प्रा.के.के.बच्छाव, कार्यालयीन अधीक्षक डॉ. राजेश निकम, उपप्राचार्य प्रा.अजय ठाकरे, प्रा.शशिकांत भदाणे, प्रा.बच्छाव, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व्ही.बी.एच.विद्यालय, कळवाडी व्ही.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळवाडी येथे प्राचार्य डी.डी.खरे, उपप्राचार्य एस.ओ.भामरे व पर्यवेक्षक एस.एस.भोईटे यांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना अभिवादन करण्यात आले. कनिष्ठचे विभाग प्रमुख प्रा.जितेंद्र देसले यांनी सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे शिक्षण व सहकार क्षेत्रातील योगदान याविषयी सखोल माहिती दिली. क्रीडाशिक्षक एस.एस.शिंदे यांनी सूत्रसंचालन तर दर्शन मोरे यांनी आभार मानले. -------- भारत विद्यालय भारत विद्यालयातर्फे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात पर्यवेक्षिक वंदना महाल यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. यावेळी विनयकुमार साळुंके यांनी हिरे यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी सर्व शिक्षक,शिक्षिकांनी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ------ रंगीत चौकट करणे ------------- केबीएच विद्यालय केबीएच माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्ल निकम होते. यावेळी उपमुख्याध्यापक नितीन गवळी, कनिष्ठचे उपप्राचार्य महेश गुंजा, पर्यवेक्षक राजेंद्र बच्छाव, वाल्मीक दासनूर, कार्यालय प्रमुख सुरेश मानूर उपस्थित होते. यावेळी जयवंत याळीस व सुनील धात्रक व प्राचार्य निकम यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी शिक्षण, सहकार आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याला उजाळा दिला. योगेंद्रसिंग ठोके यांनी सूत्रसंचालन तर परिक्षित नेरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.