मालेगाव- यंदा कसमादेत मुबलक पाणीसाठा आहे. कसमादेत अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. त्यामुळे यंदा हंगामही जोमात आहे. कसमादेत होळीनिमित्त बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कसमादेतील गावोगावच्या आठवडे बाजारात होळीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. जिल्हाभरात १९ मार्चला रंगपंचमी साजरी होणार आहे. त्यानिमित्त येथील बाजारपेठेत रंगविक्री व पिचकारीची दुकाने थाटली आहेत.