कसारा ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांना विलंब
१० ते १३ ऑक्टोबरदरम्यान इगतपुरीत नियमन; अनेक मेल-एक्स्प्रेस २० मिनिटे उशिराने
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता.९ : आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या जोडणीसह कसारा यार्डातील ‘अप’ यार्ड लाइनच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान इगतपुरी येथे किंवा त्यापूर्वी अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. परिणामी, काही गाड्या २० ते ४० मिनिटे उशिराने धावतील.
या तीन दिवसांत इगतपुरी येथे किंवा त्यापूर्वी नियमन होणाऱ्या गाड्यांमध्ये गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (१२१६६), हरिद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित एक्स्प्रेस (१२१७२), हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट (१२८७०, १० ऑक्टोबर), गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (११०८२), अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (११०५८), कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी (२२५१२), सीतापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट (१२१०८), अयोध्या कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस तुलसी (२२१३०), साईनगर शिर्डी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत (२२२२४), हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली (१२८६०), गोमतीनगर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुष्पक (१२५३३), नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तपोवन (१७६१८) आणि बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी (११०७२) यांचा समावेश आहे. या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.
११ ऑक्टोबरला अप गाड्यांनाही विलंब
रविवारी, ११ ऑक्टोबरला धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (११०१२), पाटलिपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस (१२१४२), नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत (२०७०५), प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो (१२२९४), गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (११०८०), छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस (११०६०), आग्रा कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस लश्कर (१२१६२), बरेली-लोकमान्य टिळक टर्मिनस (१४३१४), हिंगोली डेक्कन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी (१२०७२), गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (१५०१८) आणि पटना-वास्को-द-गामा एक्स्प्रेस (१२७४२) यांचे नियमन होणार आहे. या गाड्यांना ३५ ते ४० मिनिटांचा विलंब होऊ शकतो.
डाउन गाड्याही २५ मिनिटे उशिराने
१०, १२ व १३ ऑक्टोबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस-राजगीर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम, पनवेल-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-सीतापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्हारशाह नंदीग्राम, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज वंदे भारत, लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल कर्मभूमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मनमाड पंचवटी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नांदेड राज्यराणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोंदिया विदर्भ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-फिरोजपूर पंजाब मेल, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज दुरंतो, लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल अंत्योदय, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड उद्योगनगरी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा दुरंतो, कोईम्बतूर-जबलपूर सुपरफास्ट विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड एक्स्प्रेसला २० ते २५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
११ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हिंगोली डेक्कन जनशताब्दी, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगलाद्वीप, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर गरीब रथ, लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया कामायनी, दादर-गोरखपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-सुलतानपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस-सहरसा विशेष यांसह अन्य डाउन गाड्याही २० ते २५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.