रेल्वेचा कसारा येथे १२ दिवसांचा ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

रेल्वेचा कसारा येथे १२ दिवसांचा ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक
Published on: 
कसारा रेल्वे मार्गावर १२ दिवसांचा ब्लॉक तिसऱ्या मार्गिकेचे काम; लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. २ : आसनगाव-कसारा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम तसेच कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत प्री-नॉन-इंटरलॉकिंग, नॉन-इंटरलॉकिंग आणि पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जाणार असल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव-कसारा दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. ७ आणि ८ ऑक्टोबरला काही उपनगरीय गाड्यांचे मार्ग आसनगावपर्यंत मर्यादित केले जाणार आहेत. तसेच काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, काही सेवा रद्द राहणार आहेत. ७ ऑक्टोबरला ब्लॉकपूर्वी सीएसटीहून कसाऱ्यासाठी शेवटची लोकल दुपारी १२.३० वाजता, तर कसाऱ्याहून सीएसटीसाठी शेवटची लोकल दुपारी २.४२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर सीएसटीहून कसाऱ्यासाठी पहिली लोकल सायंकाळी ६.२८ वाजता, तर कसाऱ्याहून सीएसटीसाठी पहिली लोकल रात्री ८.३५ वाजता सुटेल. ८ व ९ ऑक्टोबरला वेळापत्रकात आणखी बदल करण्यात आले आहेत. या काळात ब्लॉकपूर्वी व ब्लॉकनंतरच्या लोकलच्या वेळेतही बदल होणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका ब्लॉकमुळे मुंबईहून सुटणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. एलटीटी-बनारस, एलटीटी-पाटलीपुत्र, सीएसटी-अमृतसर, सीएसटी-बनारस महानगरी आणि एलटीटी-कुशीनगर एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. इगतपुरी येथे गोरखपूर-एलटीटी, पुष्पक एक्स्प्रेस, अयोध्या कँट-एलटीटी, बलिया-दादर आणि ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचे नियमन केले जाणार आहे. काही गाड्यांना खर्डी व आटगाव येथे अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. भुसावळ विभागातही काही गाड्यांचे ३० मिनिटांपासून एक तास २५ मिनिटांपर्यंत नियमन करण्यात येणार असून, अनेक गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. क्षमता वाढणार आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम कसारा-कल्याणदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचा भाग आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्यांची वाहतूक स्वतंत्र करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाची क्षमता वाढून अतिरिक्त गाड्या चालविणे तसेच गाड्यांच्या वाहतुकीचे अधिक सुरळीत नियमन करणे शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com