KSE26B01841
नंदुरबार : येथील आगारात निवेदन देताना सुरेश पारख, मंगला पारख.
-------
कासारे फाट्यावर बसला थांबा द्यावा
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कासारे, ता. २ : नंदुरबार, पिंपळनेर रस्त्यावरील कासारे फाट्यावर नाशिक पुण्याकडे जाणाऱ्या- येणाऱ्या बस कासारे फाट्यावर थांबविण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे सुरेश पारख यांनी केली.
साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख, उपाध्यक्षा मंगला पारख, डॉ. प्रा. डी. व्ही. सोनवणे, डॉ. प्रवीण सोनवणे यांनी नंदुरबार आगार वाहतूक निरीक्षक जगताप यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कासारे, मालपूर व परिसरातील प्रवासी रोज मोठ्या संख्येने शिक्षण, व्यवसाय, नोकरी, वैद्यकीय उपचार, शेती आदी कामानिमित्त सटाणा, नाशिक, पुणे येथे जातात. परंतु, नंदुरबार आगाराच्या काही बस कासारे फाट्यावर थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. वेळेचेही नुकसान होते. रात्री आठनंतर साक्रीहून परत घरी येण्यासाठी बस नसतात. परिणामी, मोठी गैरसोय होते. त्यामुळे बस फाट्यावर थांबवाव्यात. यापूर्वीही अशा मागणीचे निवेदन साक्री तालुका प्रवासी महासंघातर्फे नंदुरबार आगारप्रमुख संदीप निकम यांना १४ जून २०२६ ला दिले होते. आगारप्रमुख निकम यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन कासारे फाट्यावर बसला थांबा देण्यास परवानगी दिली. वाहक व चालकांना सूचनाही दिल्या. परंतु, अजूनही बऱ्याच बस थांबत नसल्याच्या तक्रारी आहेत.