कसबे सुकेणे- कसबे सुकेणे ते कोकणगाव रस्त्यावर गुरुवारी (ता. ३) सायंकाळी चौदावर्षीय विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. कोकणगावकडून येणाऱ्या एका रिक्षातून आलेल्या दोन पुरुष आणि एका महिलेकडून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र विद्यार्थिनींची सतर्कता व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार टळला असून, संशयितांवर ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.