Kathak dancers
sakal
नाशिक: प्रजासत्ताक दिनी (ता. २६ जानेवारी) राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात नाशिकच्या १२ नृत्यांगनांची निवड झाली आहे. या सर्व कीर्ती कलामंदिरच्या विद्यार्थिनी असून, दिल्लीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली कला सादर करतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातून कर्तव्यपथावर निवड होणारी कीर्ती कलामंदिर ही एकमेव संस्था आहे.