काटवनमधील वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये घाण-कचरा; पशू-प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

काटवनमधील वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये घाण-कचरा; पशू-प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
Published on: 
पान तीन मेन -------------------- 16247, 16248 लुल्ले : काटवन परिसरातील घाण कचरा असलेला पाणवठा. दुसऱ्या छायाचित्रात पाणवठ्याला झाडाझुडूपांनी घातलेला वेढा. ---- काटवनमधील वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये कचरा पशू-प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती; स्वच्छ पाण्याची सुविधा देण्याची मागणी वैभव सोनवणे : सकाळ वृत्तसेवा वडेल, ता. १७ : मालेगाव तालुक्यातील काटवन परिसरात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे जंगलातील पाण्याचे स्रोत आटत आहे तर दुसरीकडे काही पाणवठ्यांमध्ये घाण आणि कचरा साचल्याने वन्यप्राण्यांना स्वच्छ पाणी मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहे. वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी तयार केलेले अनेक पाणवठे अस्वच्छ झाले आहेत. वन विभागाने सर्व पाणवठ्यांची स्वच्छता करुन पशु, प्राण्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा प्राणी मित्रांकडून व्यक्त केली जात आहे. काटवन परिसरातील वनक्षेत्रात वनविभागाने जवळपास २५ ते ३० कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांवर बिबट्या, तरस, कोल्हा, लांडगा, उदमांजर, हरीण, रानडुक्कर, ससे, मोर आदींसह विविध वन्यजीवांची तहान भागवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यानंतर टँकरद्वारे पाणवठे भरले जातात. मात्र, पाणवठ्यांमध्ये स्वच्छ आणि पिण्यायोग्य असणेही गरजेचे आहे. परंतु अनेक पाणवठ्यातील पाणी खराब झाल्याने अशा परिस्थितीत पाण्यासाठी वन्यप्राण्यांना मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहे. वन्यजीवांसाठी पाणवठे उभारल्यानंतर त्यातील पाण्याची नियमित तपासणी, स्वच्छता आणि वेळेवर पाणी भरणे आवश्यक आहे. वनविभागाने काटवन परिसरातील सर्व कृत्रिम पाणवठ्यांची तातडीने पाहणी करून अस्वच्छ पाणवठ्यांची स्वच्छता करावी तसेच वन्यजीवांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे. ---------- वनक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वनतळे १५ असून ११ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाण्याची उपलब्धता नजिक असावी. काही ठिकाणी हातपंप बसवून लहान पाणवठे करण्यात आले आहेत. तसेच टॅंकरद्वारेही कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकले जाते. पाणवटे स्वच्छ केल्यास त्यात अधिक पाणी साठवता येवू शकेल. दरम्यान या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. ------------- वन्यजीवाचे पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणवटे तयार करण्यात आले आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नाही. वन्य जीवांसाठी संरक्षित वनक्षेत्र सुरक्षित राहिले नाही. त्यामुळे वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती वाढत आहे.तसेच वन्य जीवाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. - निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.