Latest Marathi News | परतीच्या पावसाच्या सरी झेलत कावडधारक सप्तश्रृंग गडाकडे मार्गस्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saptashrungi fort

Kawad Yatra : परतीच्या पावसाच्या सरी झेलत कावडधारक सप्तश्रृंग गडाकडे मार्गस्थ

नरकोळ : नवरात्रोत्सवाची सांगता होताच कोजागरी पौर्णिमा कावडयात्रा सुरू झाली आहे. नंदुरबार, साक्री, निजामपूर, शहादा, पिंपळनेर या भागातून भक्तगण सप्तश्रृंग गडाकडे ताहाराबाद, पिंगळवाडे, केरसाणे, डांगसौदाणे, कळवणमार्गे मार्गस्थ होत आहेत. कावडमध्ये तापी, पांझरा या नद्यांचे पवित्र जल घेऊन जाणाऱ्या भाविकांकडून होत असलेल्या सप्तश्रृंगीच्या जयजयकाराने रस्ते दणाणून गेले आहेत. (kawad dhari heads to saptashrungi fort on ocassion of kojagiri malegaon news)

हेही वाचा: Malegaon : मुले पळविणारी टोळी.....अभोणा पोलिस ठाण्यातर्फे आवाहन!

परतीच्या पावसाने कावडधारकांना मोठा अडथळा निर्माण केला आहे. स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर राज्यासह मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेवून पायी येतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने कावड यात्रा बंद होत्या.

यंदा पौर्णिमा उत्सवासाठी भाविक मोठ्या आनंदाने मार्गक्रमरण करीत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे कावड यात्रा बंद होती. त्यामुळे आनंद घेता आला नाही. यंदा सर्व सहकारी उत्साहाने कावड यात्रेला जात असल्याचे सामोडे (ता. साक्री) येथील जयेश गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा: malegaon : कॉलन्यांतील रस्त्यावर अनधिकृत बांधकामे? MMCची डोळेझाक