जुने नाशिक- गोदाकाठावरील काझीगढी परिसरात वाघ कुटुंबीयांच्या घराची भिंत कोसळल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे याच घराच्या धोकादायक अवस्थेबाबत ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. १९) बातमी प्रसिद्ध करून धोका अधोरेखित केला होता. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने भीती अखेर खरी ठरली.