खामखेडयाची 'मीरा' अमेरिकेत रमली गणेशाच्या आराधनेत; 30 वर्षाची अखंड परंपरा कायम

Meera Jadhav with her Bappa
Meera Jadhav with her Bappaesakal

खामखेडा (जि. नाशिक) : खामखेडा येथील माहेरवाशीण व सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन डिएगो कार्ल्सबाड येथे वास्तव्यास असलेल्या मिरा जाधव-शेवाळे व प्रभाकर जाधव यांनी आपल्या घरी गणरायाची तीस वर्षांपासून श्री गणेशाची स्थापना करत आपली अस्सल अध्यात्मिक परंपरा सातासमुद्रापार जपत आहेत. 'मीरा' हे श्रीगणेश प्रेम संपूर्ण परिवाराला सुखावह वाटत असल्याने हा भावनिक बंध गत तीस वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. खामखेड्याच्या लेकीचं ही भक्ती मातीशी जुळलेली नाळ अधोरेखित करत असून पंचक्रोशीत हा विषय कौतुकाचा बनला आहे. (Khamkheda Meera jadhav worship of Lord Ganesha America 30 Years of Unbroken Tradition Nashik Latest Marathi News)

मागील तीस वर्षांपासून वर्ष्यापासून संपूर्ण शेवाळे-जाधव परिवार गणरायाची स्थापना करत आहेत. चाळीस वर्षांपासून त्या दूरदेशी वास्तव्यास आहेत.मागील तीस वर्षांपूर्वी आपल्या राहत्या घरी गणरायाचे आगमन झाले. गणेशाची आरास सजवण्यासाठी त्यांनी खास मातीचं लेणं सांगणारी लाकडी बैलगाडी नाशिक शहरात खास कारागिरांकडून लाकडी बैलगाडी खरेदी करत या बैलगाडीवर गणरायाला विराजमान करण्याची संकल्पना सत्यात उतरवली आहे.

शेतीचे भूषण असलेले बैलगाडी आणि गणराय अशी माती अन भक्ती याचा सुरेख संगम यानिमित्ताने साधला आहे. ही भावुक आरास पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी खास दहा ही दिवस हजेरी लावत असतात. गणेशाच्या उत्सवाला मुकलेला भावुक महाराष्ट्रीयन या प्रसन्न आरासाने मातीशी जोडले गेल्याचा भाव शेवाळे जाधव परिवाराकडे व्यक्त करतोच करतो.

कसबेसुकेणे येथील प्रभाकर जाधव हे शास्रज्ञ म्हणून कार्यरत असून तर मिरा जाधव ह्या बँकेतून निवृत्त झाल्या आहेत. विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम या परिवारात दरवर्षी बघावयास मिळत असल्याने इकडे नातलगतात कौतुकाने या उत्सवाची चर्चा दरवर्षी रंगत असते. हा परिवार दरवर्षी गणेशउत्सवाची जय्यत तयारी करतो. आकर्षक देखावे साकारतात.यावर्षी महिन्याभरापूर्वी ते भारतात आले होते.भारतातून त्यांनी गणपती तसेच आरास देखावे, मंगळागौर,-गवळणी,-भातुकली, बैलगाडी तसेच विविध डेकोरेशनचे साहित्य खरेदी करतात. आणि अमेरिका गाठतात. श्री गणेशाविषयी अनोखे नातं वर्षागणिक वाढत आहे.

आकर्षक रोषणाईचा वापर करून देखाव आकर्षक पद्धतीने सजवला जातो. यंदा केला आहे. लाकडी बैलगाडीला देखणे खिल्लारी बैलांची जोडी आणि बैलगाडीवर गणरायाची स्थापना केली आहे. सोबतीला अन्नपूर्णा, धान्यांच्या राशी, गौरी, गौरीची आभूषणे, हार, कमरपट्टा, कर्णफुले, नथ, आदी भारतीय परंपरा आदी सजावट केली आहे.देखावा व गणपती पाहण्यासाठी त्यांच्या सोसायटीतील अनेक मान्यवरांनी भेट दिल्या असुन प्रभाकर जाधव व मिरा जाधव यांचे मित्र मैत्रिणी गणपती आरतीसाठी बोलवत असतात.

प्रतिक्रिया..

परदेश्यात स्थाईक मराठी लोक आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आपले सण-उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करतात. उत्सवाच्या भावनेशी प्रामाणिक राहिल्याने अनेक वर्ष्याचा हा उत्सव आम्ही मोठ्या उत्सहाने साजरा करत आहोत.

मीरा जाधव,

कॅलिफोर्निया अमेरिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com