खंडेनवमी व शस्त्र पुजन

खंडेनवमी व शस्त्र पुजन
Published on: 
SMD26B01187 सामोडे : खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन करताना संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व प्रशिक्षणार्थी. ----------- सामोडेच्या आयटीआयमध्ये खंडेनवमी उत्साहात प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक साहित्य, टूलकिटचे वाटप सकाळ वृत्तसेवा सामोडे, ता. १९ : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी (ता. १९) खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी संस्थेच्या इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर व संगणक प्रयोगशाळेत मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे सचिव विनायक देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे चेअरमन प्रकाश शिंदे, संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंदे, सचिव शरद शिंदे, हंसराज शिंदे, संजय शिंदे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य योगेश सोनवणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी प्रशिक्षणार्थींना विविध शस्त्रांचे प्रकार व त्यांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. चेअरमन प्रकाश शिंदे यांनी खंडेनवमी व शस्त्रपूजनाचे महत्त्व विशद केले. प्राचार्य योगेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणासोबत उद्योजकतेची कास धरून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य योगेश सोनवणे, निदेशक गोकुळ मोरे, चंद्रकांत सोनवणे, रूपाली देशमुख, सचिन सोनवणे, महेंद्र चौरे, संजय ससले आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गोकुळ मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशासकीय अधिकारी भगवान देवरे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com