साक्रीत खान्देश संस्कृती फेस्टिवलचे आयोजन

साक्रीत खान्देश संस्कृती फेस्टिवलचे आयोजन
Published on: 
SKR26B02740 साक्री : खानदेश संस्कृती फेस्टिव्हलचे उद्‌घाटन करताना धरती देवरे. शेजारी ॲड. पूनम शिंदे- काकुस्ते, मोनाली कारंडे आणि आयोजक. ----------------- महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा धरती देवरे : साक्रीत खानदेश संस्कृती फेस्टिव्हलचे उद्‌घाटन सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. ३० : महिला उद्योजकांनी आपल्या उद्योगांना भरारी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे आवाहन भाजपच्या जिल्हाध्यक्षा धरती देवरे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी महिलांच्या विविध स्टॉलवर भेटी देत त्यांना प्रोत्साहित केले. साक्री शहरात राजे मंगल कार्यालयात खानदेश संस्कृती फेस्टिवल या सांस्कृतिक मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे नेते तथा माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा ॲड. पूनम शिंदे- काकुस्ते, गटविकास अधिकारी मोनाली करांडे आदी उपस्थित होते. खानदेश फेस्टिव्हलच्या निमित्ताने खाद्यपदार्थ, कपडे, गृह सजावट सामान, खाण्याचे स्टॉल महिला उद्योजक व बचतगटांच्या माध्यमातून वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले असल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकांची गर्दी झाली. ॲड. काकुस्ते म्हणाल्या, आपली स्वप्न ही लहान असू शकतात. परंतु, ती ताकतीने व मेहनतीने साकारण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. या फेस्टिव्हलचे आयोजन खुशी चौधरी, शालिनी भामरे, मयुरी बोरसे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. तर सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरी यांचे विशेष सहकार्य महिलांना लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.