Nashik News : खानगावनजिक बनले मिरचीचे Hub! अडीच वर्षात 30 कोटी 15 लाखांची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

green chillies

Nashik News : खानगावनजिक बनले मिरचीचे Hub! अडीच वर्षात 30 कोटी 15 लाखांची उलाढाल

लासलगाव (जि. नाशिक) : आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपली कात झटकली असून आता भाजीपाला क्षेत्रातील मिरचीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आकर्षित करत आहे. अवघ्या अडीच वर्षात मिरचीने तीस कोटी १५ लाखाची उलाढाल केल्या असून यातून बाजार समितीला २५ ते ३० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. (Khangaonnajik became Chilli Hub 30 crores 15 lakhs turnover in two half years Nashik News)

लासलगाव बाजार समितीने उपबाजार अहवाल खानगाव नजीक येथे सुरुवातीला द्राक्षमणी लिलाव सुरू केले, त्यानंतर मागील दोन ते अडीच वर्षापासून भाजीपाला मिरचीचे लिलावास उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने दोन वर्षात या उपबाजार समितीच्या आवारावर तब्बल ३० कोटी १५ लाख ३० हजार एवढी उलाढाल झाली आहे. यातून बाजार समितीला २५ ते ३० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

लासलगाव पिंपळगाव रस्त्यावरील खानगाव (नजीक) हे प्रामुख्याने चांदवड व निफाड तालुक्याला जोडणारे प्रमुख गाव असून यात प्रामुख्याने वडाळीभोई, पिंपळद, भोयेगाव, वडनेर भैरव, कानमंडाळे, उर्धुळ, रानवड, सावरगाव, नांदुर्डी, सारोळे खुर्द, ऊगाव, वनसगाव यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या मालाला या आवारात चांगले भाव मिळत असल्याने पहिली पसंती मिळत आहे.

बाजार समितीच्या आवारावर प्रामुख्याने हिरव्या मिरचीसाठी बलराम तर सिमला मिरचीचे ज्वाला व ज्वेलरी तर पिकेडोरमध्ये सितारा जातीचे वाण लिलावासाठी येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लासलगाव बाजार समितीचे उपबाजार असलेले खानगाव नजीक हे मिरचीचे हब होईल यात शंका नाही.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik News : डॉ. हुसेन रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केंद्र 3 वर्षापासून बंद!

"शेतकऱ्यांच्या मालाला रोख पेमेंट मिळत आहे, शिवाय वेळ आणि खर्च याचीही बचत होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे स्पर्धक व्यापाऱ्यामुळे मालाला चांगला भाव मिळत आहे."

- गणेश देशमुख, जय महाकाली व्हेजिटेबल कंपनी, लासलगाव

"द्राक्षमणी साठी सुरू केलेल्या या बाजार समितीच्या आवारावर अडीच वर्षात भाजीपाल्यासह मिरचीचे लिलाव सुरू झाल्याने शेतकरी व्यापारी यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे लवकरच शासकीय दरात मोठी जागा खरेदी करून या जागेत भुसार व तेलबिया यांचे लिलाव लवकरच सुरू करण्याच्या बाजार समितीचा मानस आहे."

- सुवर्णाताई जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती.

"खानगावनजीक व खडक माळेगाव हे ग्रुप ग्रामपंचायतीमधील गाव असून या उपबाजार समितीमुळे निश्चितच परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे मिळू लागले आहे तसेच व्यापारी वर्गासाठीही चालना मिळाली आहे."

- दत्ताकाका रायते, सामाजिक कार्यकर्ते, खडक माळेगाव.

हेही वाचा: SAKAL Impact News : अन् पादचारी पूल नागरिकांसाठी झाला खुला!; नागरिकांनी मानले आभार