Onion
sakal
नाशिक: सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस झाल्याने खरीप (लाल) कांद्याच्या क्षेत्रात तब्बल ५० हजार हेक्टरची वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. गेल्या वर्षी एक लाख पाच हजार हेक्टरवर लाल कांद्याची लागवड झाली. तर यंदा एक लाख ५३ हजारांवर हे क्षेत्र पोहोचले असून, अजूनही लागवड सुरू असल्याने यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते.