खेडलेझुंगे- वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार गोदातीर येथून भीमातीराकडे पायी प्रस्थान करणाऱ्या योगिराज तुकारामबाबा संस्थानच्या आषाढीवारीचा मंगल प्रस्थान सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. श्री गुरुवर्य योगिराज तुकारामबाबा खेडलेकर यांच्या पालखीचे रघुनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान होऊन वारीला भक्तिभावाने सुरुवात झाली आहे.