खिर्डीसाठे परिसरात मजुरांवर बिबट्याचा अचानक हल्ला;

खिर्डीसाठे परिसरात मजुरांवर बिबट्याचा अचानक हल्ला;
Published on: 
NRS26B02406 खिर्डीसाठे (ता.येवला) ः येथील योगेश ईप्पर यांच्या शेतात वनविभागाने लावलेला पिंजरा. -------------------- ३६-३ मजुरांच्या टोळीवरच बिबट्याचा हल्ला --------------- खिर्डीसाठे येथील घटना, आरडाओरडमुळे पळाला, भीतीने महिला बेशुद्ध -------------- सकाळ वृत्तसेवा नगरसूल, ता.२३ : खिर्डीसाठे (ता. येवला) येथील लोहशिंगवे रस्त्यालगत सुनील राख यांच्या शेतात मका सोंगणी सुरू असताना शुक्रवारी (ता.२३) अचानक बिबट्याने मजुरांवर हल्ला चढविला. मजुरांची संख्या जास्त असल्याने आरडाओरड करताच बिबट्याने तेथून धूम ठोकली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एक महिला मजूर प्रचंड घाबरून बेशुद्ध झाली. तिला नगरसूल येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान हे सर्व मजूर मध्यप्रदेशातून आले आहेत. ----------------- घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खिर्डीसाठे परिसरात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. दरम्यान मादी बिबट्या व तिची पिले उसाच्या शेतात काही शेतकऱ्यांना आढळून आल्याची माहिती महेश चकोर यांनी दिली. परिसरातील रस्त्याने ये- जा करताना अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत नवनाथ नागरे, योगेश ईपर, उमेश नागरे आणि रोहन राख यांनी वनाधिकारी ज्ञानेश्वर वाघ यांना माहिती दिली होती. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था केली; मात्र अद्याप बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालेला नाही. १६-१ शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण परिसरातील तूर आणि उसाच्या शेतांमध्ये अनेक कुत्र्यांचे तसेच एका हरणाचे अवशेष आढळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून कार्यवाही सुरू आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी तसेच नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध व्यक्तींना एकटे बाहेर पाठवू नये. शेतात काम करताना समूहाने काम करावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला कळवावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com