खोडाईमाता यात्रोत्सवात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

खोडाईमाता यात्रोत्सवात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Published on: 
खोडाईमाता यात्रेत खाद्यपदार्थांची तपासणी हॉटेलमधून १९ किलो जलेबीसह ५४८ किलो गोडशेव जप्त सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १४ : येथे नवरात्रोत्सवादरम्यान सुरू असलेल्या खोडाई माता यात्रेत हॉटेल व स्विटच्या दुकानांची तपासणी करून अन्न व औषध प्रशासनाने १९ किलो जिलेबीसह ५४८ किलो गोडशेव जप्त केली आहे. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त सपना गोडसे- पाटील यांनी दिली. यात्रेत लावण्यात आलेल्या हॉटेल्स व मिठाईच्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या वेळी काही अन्न पदार्थात सिन्थेटीक कलरचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केला असल्याच्या संशयावरुन एक लाख ९ हजार ६०० रूपये किमतीची ५४८ किलो गोड शेव, तीन हजार २८० रूपये किमतीची १९ किलो जलेबी जप्त करण्यात आली. गोडशेव व जलेबीचे नमुने विश्लेषणाकरीता प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत संबंधितांवर पुढील कारवाई घेण्यात येणार आहे. यात्रेतील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानाचे परवाने घेतलेले आहे किंवा नाही याबाबत पेढ्यांची तपासणी करण्यात आलेली असून, सर्व हॉटेल व्यावसायिकांनी अन्न पदार्थात कुठल्याही प्रकारचा सिन्थेटीक कलर वापरु नये, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मिठाईमध्ये कलरबाबत परमिसिबिल लिमिट असले पाहिजे व ग्राहकांना न्यूज पेपरच्या कागदांवर विक्री करु नये. विना परवाना व्यवसाय करु नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नंदुरबार कार्यालयाच्या सहायक आयुक्त सपना गोडसे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र डौले, संकेत सदाफुले, समाधान बारी, सौरव देवकर, कृष्णा वळवी यांनी कारवाई केली. ----- प्रशासनाचा इशारा जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा मानके कायदे आणि नियमांचे तंतोतंत पालन करुनच स्वच्छ व सुरक्षित वातावरणात व्यवसाय करावा. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणा-या आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com