मालेगाव - फळांचा राजा येथील बाजारात दाखल झाला आहे. आंब्याचे दर जास्त असल्याने किरकोळ अपवाद वगळता विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतिक्षा आहे. येथील बाजारात लाल बाग, बदाम, हापूस आदी जातीचे आंबे आले आहेत. फारसे ग्राहक नसल्याने व्यावसायिकांना देखील मोजकाच आंबा विक्रीसाठी मागविला आहे. शहरासह कसमादे भागात अक्षयतृतीयेपासून आंब्याला मागणी असते.