किनगावमध्ये मुख्य रस्त्यावरून हिंदूंच्या मिरवणुकांवर बंदी कशी?

किनगावमध्ये मुख्य रस्त्यावरून हिंदूंच्या मिरवणुकांवर बंदी कशी?
Published on: 
(किरीट सोमय्या यांचा संग्रहित फोटो वापरावा) ---- किनगाव घटनेतील दोषींना तडीपार करा --- भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेत मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : किनगाव (ता. यावल) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर आणि पोलिसांवर झालेली दगडफेक अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच संबंधितांना तडीपार करावे, अशी मागणी भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. सोमय्या यांनी पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध केला. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, ५७ संशयितांची ओळख पटविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फरारी संशयितांचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली. जखमी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच संबंधितांना तडीपार करण्याची मागणी आपण पोलिसांकडे केल्याचेही श्री. सोमय्या म्हणाले. कोणत्याही गावात धार्मिक मिरवणुका आणि उत्सवांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मुद्द्याची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असली, तरी नागरिकांना धार्मिक परंपरा पाळता याव्यात, यासाठी योग्य व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. किनगावमधील परिस्थितीची सखोल चौकशी करून धार्मिक मिरवणुकांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महापौर दीपमाला काळे, डॉ. केतकी पाटील, आमदार अमोल जावळे, डॉ. राधेश्याम चौधरी, चंद्रकांत बाविस्कर या वेळी उपस्थित होते. मनोज भंडारकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com