Kirit Somaiya | संस्कार, संस्कृती, धर्माचे विस्मरण नको : किरीट सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

Kirit Somaiya | संस्कार, संस्कृती, धर्माचे विस्मरण नको : किरीट सोमय्या

नाशिक : काही वर्षांपूर्वी देशाकडे आंतरराष्ट्रीय बँकेच्या कर्ज परतफेडीसाठी परकीय चलनाचा तुटवडा असल्याने आपल्यावर देशाचे सोने तारण ठेवण्याची वेळ होती. त्याच भारताचा आज जगभरातील विविध पाच देशांमध्ये परकीय चलन राखीव आहे. देशाचा विकास होत असतानाच आपली संस्कृती, संस्कार आणि धर्माचे विस्मरण होऊ नये, यासाठी ब्राह्मण समाजातील विविध संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी (ता.२१) केले. (Kirit Somaiya Statement at Golden Jubilee Concluding Ceremony of Akhil Brahmin Central Institute nashik news)

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज साहाय्य संस्थेतर्फे संस्थेच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रमुख पाहूणे किरिट सोमय्या यांच्या हस्ते ध्वजारोहण व परशुराम मूर्तिपूजन तसेच मंत्रोच्चराच्या गजरात चतुर्वेद प्रतिमा पूजनाने करण्यात आले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विजय काकतकर यांच्यासह उदयकुमार मुंगी, ॲड. समीर जोशी, सुहास शुक्ल, चंद्रशेखर जोशी, सुभाष सबनीस, सचिन पाडेकर, अनिल देशपांडे, उल्हास पंचाक्षरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Dhule News : अक्कलपाडा पाणी योजनेसाठी ‘एक्स्प्रेस फिडर’; महावितरणकडून विशेष बाब म्हणून मान्यता

ब्राह्मण समाज नेहमीच गुरुस्थानी राहिला असून विद्यादानाच्या माध्यमातून देशाचा बौद्धिक विकास झाला आहे. त्याद्वारे आर्थिक विकास ही साधला जात आहे. विकास केवळ शहरी भागापुरताच मर्यादित न राहाता खेडी, वाड्या-पाड्यांवरही पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेसारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही सोमय्या यांनी या वेळी केले.

दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ब्राह्मण समाजातील व्यक्तींचा या वेळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वसुधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. गंगाधर कुलकर्णी यांनी आभार मानले.

हेही वाचा: SAKAL Exclusive : तरुणाईला भावतोय ‘वकिली’चा पेशा!

टॅग्स :NashikKirit Somaiya