धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
सडगावला आज
कीर्तनाचा सोहळा
धुळे : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर जगन्नाथ गर्दे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त सडगाव (ता. धुळे) येथे शनिवारी (ता. ७) कीर्तनाचा सोहळा होणार आहे. ‘जागर भाऊसाहेबांच्या आठवणींचा!’ या उपक्रमांतर्गत होणाऱ्या या सोहळ्यात शिवलिलाताई पाटील यांचे कीर्तन होईल. ते रात्री नऊ ते अकरा या कालावधीत होणार आहे. नागरिकांना उपस्थितीचे आवाहन आयोजक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई मधुकर गर्दे, तुषार गर्दे, गणेश गर्दे आदींनी केले.
-
कापडणे परिसरातून
तीन मेंढ्यांची चोरी
धुळे : कापडणे (ता. धुळे) शिवारात शेतात बांधलेल्या तीन मेंढ्या चोरट्याने नेल्याची घटना घडली. या मेंढ्यांची किंमत दीड लाख रुपये आहे. याबाबत काशीनाथ दामोदर दगडे (वय ३६, रा. मल्हारपाडा, सायने, ता. धुळे) यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोहर पाटील यांच्या शेतात बांधलेल्या मेंढ्या चोरट्याने नेल्या. दोन नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा ते तीन नोव्हेंबरच्या पहाटे चारदरम्यान ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
दोन तरुणी बेपत्ता;
फूस लावून पळविले
धुळे : सोनगीर (ता. धुळे) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून २१ वर्षीय तरुणीला फूस लावून पळविल्याची फिर्याद तिच्या भावाने दिली. दुसऱ्या घटनेत धुळे शहरातील चितोड रोड परिसरातून २५ वर्षीय तरुणीला चौदा ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास फूस लावून पळविले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
जवानांच्या ट्रॅव्हल्स
अपघातात १२ जखमी
धुळे : दिवाळीनिमित्त आपल्या गावी निघालेल्या धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या खासगी ट्रॅव्हल्सला कऱ्हाडजवळ अपघात झाला. या घटेनत तीन चालक आणि १२ प्रशिक्षणार्थी पोलिसांसह १५ जण जखमी झाले आहेत. धुळे शहरातील संतोषीमाता मंदिर ते लेनिन चौकदरम्यान पोलिस प्रशिक्षण केंद्र असून, तिथे भरती झालेल्या नवीन जवानांना नऊ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करवा लागतो. दिवाळीमुळे प्रशिक्षणार्थींना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रातील हे जवान खासगी आराम बसने आपल्या गावी निघाले होते. रात्री अडीचच्या सुमारास कऱ्हाड तालुक्यातील मसुदजवळ त्यांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराच्या मागमीसाठी पुणे- बेंगळुरू महामार्ग रोखून धरला होता, ज्यामुळे धुळ्याहून कोल्हापूरकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स मसुदमार्गे कऱ्हाडकडे जात होती. यादरम्यान हा अपघात घडला. मसुद पोलिसांनी सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी प्रशिक्षणार्थी हे सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागातील रहिवासी आहेत.
-