Know Your Army : 'या' तारखेपासून ‘नो युवर आर्मी’ लष्कर प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Know Your Army Army Exhibition

Know Your Army : 'या' तारखेपासून ‘नो युवर आर्मी’ लष्कर प्रदर्शन

नाशिक : खासदार हेमंत गोडसे आणि युनायटेड व्ही स्टॅन्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (ता. १८) व रविवार (ता १९) मार्चला ‘नो (know) युवर आर्मी’ नावाचे भव्य प्रदर्शन गोल्फ क्लब मैदानाजवळील इदगाह मैदानावर होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असल्याचे माहिती खासदार गोडसे यांनी दिली. (Know Your Army Army Exhibition from 18 march 2023 nashik news)

शनिवारी सकाळी नऊला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार असून, संरक्षण राज्यमंत्री अजय भट, भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना आमंत्रित करण्यात येणार आहे. युनायटेड व्ही स्टॅन्ड फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मटाले हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

प्रदर्शनात लष्कराच्या सदर्न कमांड अंतर्गत विविध सात राज्यातील लष्करी विभागांचे केवळ आर्टिलरीच नव्हे तर इतर शस्त्रास्त्रे प्रदर्शित केली जाणार आहे. तोफखाना (विविध तोफा), शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकीय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, निवृत्त सैनिकांच्या सेवेसाठी आर्मी रेकॉर्ड स्टॉल, प्रादेशिक सैन्य शस्त्रे, सिम्फनी बँड, आर्मी बँड,

घोडदौड, टेन्ट पॅकिंग, डेअर डेव्हिल्स, जिम्नॅस्टिक लाइव्ह शो हे प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. संरक्षण दल वापरत असलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे हे प्रदर्शन असणार आहे. यात तरुणांना सैनिकांशी संवाद साधण्यासाठी तसेच अग्नीवीर भरती संदर्भात देखील इथे मार्गदर्शन होणार असल्याने प्रथमच एवढं भव्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

२ हजार शाळांचा सहभाग

शहर जिल्ह्यातील नागरिक व सुमारे २ हजार शाळा आणि महाविद्यालये, अनाथाश्रम, दिव्यांग मुलांच्या संस्था तसेच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी या सर्वांना आमंत्रित करण्यात महाराष्ट्रातील सर्वात अविस्मरणीय आणि अनोखा कार्यक्रम असेल. असे भव्य प्रदर्शन अजून संपूर्ण महाराष्ट्रात घडलेली नाही.

स्कूल ऑफ आर्टिलरी, सैन्याचे मुख्य प्रशिक्षण केंद्र, हवाई दल आणि इतर संरक्षण विभागांचा समावेश असेल. शासकीय शाळेचे विद्यार्थी व तरुण येणार असल्यामुळे यातून प्रत्येकाची देशभक्ती द्विगुणित होऊन सैनिकांचे देशाप्रती योगदान अनुभवायला मिळणार आहे. संस्कृती आणि संस्कृतीने नटलेल्या व राष्ट्रीय एकात्मतने संपन्न असलेल्या देशाच्या देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम नाशिककरांना बघायला मिळणार आहेत. असेही खासदार गोडसे यांनी सांगितले.

प्रदर्शनात आयुध साहित्य

प्रदर्शनात तोफा, रणगाडे, रायफल्स, रॉकेट लाऊंचर्स, इंडियन फील्ड गन, आर्मी अभियंता साहित्य, बोफोर्स, धनुष्य, १०५ आयएफजी, एलएमजी गन, आदी आयुध साहित्य असणार आहे.

टॅग्स :NashikArmy jawan