समता प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेतून पाच दिवस ज्ञानजागर! २७ व्या वर्षात पदार्पण;बंडगर,चंदनशिवे,सुतार,पवार,जायभावे या व्याख्यात्यांची मांदियाळी

समता प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेतून पाच दिवस ज्ञानजागर! २७ व्या वर्षात पदार्पण;बंडगर,चंदनशिवे,सुतार,पवार,जायभावे या व्याख्यात्यांची मांदियाळी
Published on: 
पान चार ------------------- समता प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेतून पाच दिवस ज्ञानसागर व्याख्यात्यांची मांदियाळी; २६ नोव्हेंबर पासून प्रारंभ सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१८ : सामाजिक प्रबोधन, वैचारिक जागृती आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने समता प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या ‘प्रागतिक विचार व्याख्यानमाले’चा वैचारिक ज्ञानसागर यंदा २६ नोव्हेंबरपासून होणार आहे. २७ व्या वर्षात पदार्पण करणारी ही व्याख्यानमाला येथी महात्मा फुले नाट्यगृह येथे रंगणार आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन २६ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते होणार असून, आमदार सत्यजित तांबे समारंभाच्या अध्यक्षस्थानी तर उद्योगपती सम्राट वर्मा यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे.जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर (सोलापूर) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व व्याख्यानासाठी उपस्थित राहण्याचे आव्हान व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रा.डॉ. अजय विभांडिक, कार्याध्यक्ष ॲड.दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. एस. के. पाटील, सरचिटणीस प्रा.अर्जुन कोकाटे यांनी केले आहे. -------- तारीख वक्ते विषय प्रमुख पाहुणे २६ नोव्हेंबर ज्ञानेश्वर महाराज बंडगर संत तुकाराम महाराज आणि आजचा महाराष्ट्र बाळासाहेब कापसे, नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी २७ नोव्हेंबर नितीन चंदनशिवे मराठी कवितेचा दिलखुलास प्रवास महेंद्र काले, सुशील गुजराथी असतील. २८ नोव्हेंबरला कमलेश सुतार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा सभापती वसंतराव पवार, राजेश भांगडे ९ नोव्हेंबरला हनुमंत पवार वारकरी विचार स्वराज्याचा एल्गार आणि समतेचा स्वीकार ॲड. समीर देशमुख, उषाताई शिंदे ३० नोव्हेंबरला ॲड. जयंत जायभावे ‘लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी भारतीय संविधानाची साक्षरता’ सुरज पटणी, डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.