वणीच्या जगदंबा माता मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात कावडीधारकांच्या जलाने जलाभिषेक; मध्यरात्री मंत्रघोषात महाआरती

वणीच्या जगदंबा माता मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात कावडीधारकांच्या जलाने जलाभिषेक; मध्यरात्री मंत्रघोषात महाआरती
Published on: 
पान चार ॲंकर ----------------------- 13364, 13365 वणी : दुसऱ्या छायाचित्रात अभिषेका दरम्यान भाविकांची दर्शनासाठी झालेली गर्दी. वणीत कोजागिरी पौर्णिमा उत्साहात कावडीधारकांच्या जलाने जलाभिषेक; मध्यरात्री मंत्रघोषात महाआरती सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २६ : श्री सप्तशृंगी मातेची भगिनी आणि आदिमायेचे मूळरूप मानल्या जाणाऱ्या वणी येथील श्री जगदंबा माता मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्सव विविध धार्मिक विधी, भजन आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. मध्यरात्री मंत्रघोषात झालेला देवीचा जलाभिषेक, आकर्षक साजशृंगार आणि महाआरतीसाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वर, नाशिक, पुणे, महाबळेश्वर यांसह विविध ठिकाणांहून पवित्र नद्यांचे जल घेऊन हजारो कावडीधारक आणि पदयात्रेकरू वणी येथे दाखल झाले होते. कावडीधारकांनी दोन गडव्यांतून आणलेल्या पवित्र जलापैकी एका गडव्यातील जल जगदंबा मातेला जलाभिषेकासाठी अर्पण करण्यात आले, तर दुसऱ्या गडव्यातील जल श्री सप्तशृंगी भगवतीच्या अभिषेकासाठी गडावर नेण्यात आले. गडावर कावड घेऊन जाणे शक्य नसलेल्या भाविकांनी जगदंबा माता मंदिरात जल अर्पण केले. वणी आणि परिसरातील काही भाविकांनी श्रीक्षेत्र करंजी देवस्थान येथून कावडीने जल आणून देवीच्या अभिषेकासाठी अर्पण केले. उत्सवानिमित्त सकाळी जगदंबा मातेची पंचामृत महापूजा झाली. दुपारची नैवेद्य आरती पंचाळ समाजाच्या मानकऱ्यांच्या हस्ते पार पडली. कोजागिरी पौर्णिमेच्या परंपरेनुसार श्री दत्त भजन मंडळाच्या वतीने मंदिरात भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. रविवारी रात्री नऊला जगदंबा मातेच्या अभिषेक महापूजेला प्रारंभ झाला. देवीचे पुजारी सुधीर दवणे यांनी जगदंबा मातेचा विशेष रंगाच्या महावस्त्रांनी आणि सोन्या-चांदीच्या आभूषणांनी साजशृंगार केला. देवीच्या कुंकवात पौर्णिमेच्या पूर्णचंद्राची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यामुळे देवीचे रूप अधिकच आकर्षक दिसत होते. रात्री बाराला वाजता पुरोहित वासुदेवशास्त्री जोशी यांनी मंत्रोच्चारात अभिषेकविधी केला. त्यानंतर पुजारी सुधीर दवणे यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली. या वेळी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष सोनू थोरात, विश्वस्त रोशन जहागिरदार, राकेश थोरात, रवी थोरात, बाळासाहेब देशमुख, पोपटराव थोरात, गणेश देशमुख यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. -------- दर्शनासाठी भाविकांची रेलचेल रविवारी (ता. २५) सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी सुरू झालेली कोजागिरी पौर्णिमा सोमवारी (ता. २६) सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी समाप्त झाली. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रेलचेल सुरू होती. गडावरील श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतल्यानंतर वणीच्या जगदंबा मातेचे दर्शन घेतल्याशिवाय आदिमायेचे दर्शन पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेतून जगदंबा माता मंदिरात नेहमीपेक्षा अधिक गर्दी झाल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com