रावळगावला कोजागिरीचे दूध तापविताना रबर बनले

रावळगावला कोजागिरीचे दूध तापविताना रबर बनले
Published on: 
कोजागरीला दूध तापविताना बनले रबर! -------------------------------- रावळगाव येथील प्रकार; ग्रामपंचायतीकडून तक्रार दाखल सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २७ : रावळगाव (मालेगाव) ओंकारनगर येथील शिव गणेश व नवरात्र उत्सव मंडळाने कोजागरी पौर्णिमेसाठी आणलेले २५ लिटर दूध तापविताना त्याचे चिकट रबरासारखा पट्टा तयार झाला. या प्रकारामुळे गाव व परिसरात खळबळ उडाली. हा प्रकार नेमका कशामुळे घडला हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडून अन्न व औषध विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. चौकशी नंतरच या प्रकरणातील सत्य समोर येईल. या बाबतची माहिती अशी, ओंकारनगर येथील श्री सप्तशृंगी देवी मंदिरात मंडळाकडून दरवर्षी कोजागरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. ऐनवेळी दूध उपलब्ध होते की नाही म्हणून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गावातीलच एका डेअरीतून २५ लिटर दूध आदल्या दिवशी घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी रात्री चुलीवर मोठ्या पातेल्यात दूध तापविताना त्यात अचानक रबरासारखा चिकट पदार्थ तयार होऊ लागला. पळीतून तो वर उचलल्यास ५ ते ७ फूट ताणला जात होता. या प्रकारामुळे उपस्थित महिला, पुरुष चकित झाले. दूध फाटल्यावर त्याचे बारीक गोळे होऊन ते खिरूजसारखे होते. मात्र असे न होता रबरासारखा मोठा चिकट पदार्थ तयार झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी चर्चेला उधाण आले. दुधात भेसळ झाली की ते कृत्रिम होते अशी चर्चा सुरू झाली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर दूध कोणालाही वाटप न करता सुरक्षित ठेवले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. नमुन्यांची तपासणी केल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होऊ शकेल. कोट... गावातील ओंकारनगर भागात घडलेल्या प्रकाराची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली आहे. अन्न भेसळ यंत्रणेकडे तक्रार दाखल केली आहे. अधिक काळ दुधाची साठवणूक केल्याने जैव रासायनिक क्रिया झाली की दुधात भेसळ झाली हे नमुने तपासणीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. तसेच ‘दूध का दूध’ व ‘पानी का पानी’ हे देखील सिद्ध होईल. जर भेसळ असेल तर दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाईल. - ॲड. महेश पवार, सरपंच तथा प्रशासक, ग्रामपंचायत रावळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com