कोजागरीनिमित्त दुधाची विक्रमी विक्री; पाच लाख लिटरचा टप्पा

कोजागरीनिमित्त दुधाची विक्रमी विक्री; पाच लाख लिटरचा टप्पा
Published on: 
सेकंडमेन --------- जिल्ह्यात कोजागरीनिमित्त दुधाची विक्रमी विक्री ----- पाच लाख लिटरचा टप्पा पार; डेअरींसह किरकोळ विक्रेत्यांकडेही गर्दी; मसाला दुधालाही मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२५ : कोजागरी पौर्णिमेनिमित्त दूध पिण्याच्या परंपरेमुळे जिल्ह्यात दुधाची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. कोजागरीच्या पार्श्वभूमीवर पाच लाख लिटरहून अधिक दुधाची विक्री झाल्याचा अंदाज आहे. सायंकाळपासूनच दूध डेअरी, दूधविक्री केंद्रे व मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली होती. साध्या दुधासोबतच मसाला दूध व आटवलेल्या दुधालाही ग्राहकांची पसंती मिळाली. कोजागरी पौर्णिमेला रात्री जागरण करून दूध पिण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने अनेक कुटुंबांत घरीच मसाला दूध तयार केले जाते, तर काही ठिकाणी मित्रमंडळी व सोसायट्यांमध्ये एकत्र येऊन कोजागरी साजरी केली जाते. त्यामुळे दररोजच्या तुलनेत दुधाच्या मागणीत वाढ होते. ही मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी अतिरिक्त दुधाची व्यवस्था केली होती. ....... सायंकाळी खरेदीसाठी गर्दी कोजागरीच्या दिवशी सायंकाळनंतर दूध खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली. अनेकांनी घरगुती वापरासाठी अतिरिक्त दूध खरेदी केले. काही ठिकाणी मसाला दूध तयार करून विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. बदाम, पिस्ता, केशर व वेलायची घातलेल्या मसाला दुधाला विशेष पसंती मिळाली. मिठाईच्या दुकानांतही दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी वाढल्याचे चित्र होते. ...... विक्रेत्यांकडून अतिरिक्त व्यवस्था कोजागरीनिमित्ताने दुधाची मागणी वाढणार असल्याचा अंदाज असल्याने विक्रेत्यांनी दूध उपलब्धतेचे नियोजन केले होते. ग्राहकांना वेळेत दूध मिळावे, यासाठी वितरणावर भर देण्यात आला. दुधाच्या विक्रीत झालेल्या वाढीमुळे दूधडेअरी व संबंधित व्यावसायिकांना चांगला व्यवसाय मिळाला. ...... परंपरेसोबत बाजारपेठेतही उत्साह बदलत्या जीवनशैलीतही कोजागरी पौर्णिमेची परंपरा कायम असल्याचे या निमित्ताने दिसून येते. काही कुटुंबे पारंपरिक पद्धतीने घरी दूध आटवून मसाला दूध तयार करतात, तर काही जण तयार दूध खरेदी करून उत्सव साजरा करतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या परंपरेत सहभागी होतात. कोजागरीच्या निमित्ताने वाढलेल्या दुधाच्या मागणीमुळे बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण होते. ....... कोट कोजागरी पौर्णिमेला दरवर्षी दुधाच्या मागणीत वाढ होते. यंदाही ग्राहकांकडून दूधखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ग्राहकांनी घरी मसाला दूध तयार करण्यासाठी अतिरिक्त दूध घेतले, ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आधीपासूनच दुधाच्या उपलब्धतेचे नियोजन केले होते. -शैलेश मोरखडे व्यवस्थापकीय संचालक (एमडी), जिल्हा दुध उत्पादक संघ, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com