रुक्मिणी फाउंडेशनतर्फे कोजागिरी

रुक्मिणी फाउंडेशनतर्फे कोजागिरी
Published on: 
NSK26H33544 जळगाव : रुख्मिणी फाउंडेशन मिडटाऊनतर्फे कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमास उपस्थित आमदार सुरेश भोळे, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य. ----- रुख्मिणी फाउंडेशन मिडटाऊनतर्फे कोजागरीनिमित्त विविध खेळस्पर्धा ---- आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : येथील रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊनतर्फे शनिवारी (ता.२४) कोजागरी पौर्णिमेनिमित्ताने विविध मनोरंजनात्मक खेळांचा कार्यक्रम रंगला. यातील विजेत्या स्पर्धकांना आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सागर पार्क परिसरातील रहिवासी राहुल चौधरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे ब्युरोचिफ सचिन जोशी उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनच्या सभासदांमधील झालेल्या कपल स्पर्धेत टिकली लावणे, बांगड्या घालणे, केसांत स्ट्रॉ लावणे अशा स्पर्धा, तर पुरुष व मुलांसाठी बादलीत चेंडू टाकणे अशा प्रकारचे खेळ खेळण्यात आले. सविता वाणी यांनी हिंदी गाणी सादर केली. त्यानंतर सभासदांनी स्वादिष्ट व मसालेदार दुधाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी वासंती चौधरी यांचे सहकार्य लाभले. पंकज जैन यांनी आभार मानले. डाॅ. विजय साखला, राजू श्रॉफ, सुभाष जगताप, अनिल चोरडीया, मणिशंकर वर्मा, मनीष वाणी, नचिकेत वाणी, भूषण जगताप, शीतल जैन, कल्पक सांखला, राहुल चौधरी, सुशांत राका, राज शर्मा, महाश्वेता माथुरवैश्य, संगीता राजपूत, राणी राजपूत, प्राजत्ता चौधरी आदी उपस्थित होते. --- खेळांमधील विजेते असे टिकली लावणे : शीतल जैन व तृप्ती जैन बांगडी भरणे : नीलेश नागला व प्रिया नागला चेंडू बादलीत टाकणे : सोहम जोशी मुलांच्या स्पर्धेत : माधव राहुल चौधरी, रोशन चौधरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com